Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 06:21 AM2021-06-01T06:21:11+5:302021-06-01T06:22:21+5:30

Corona Vaccination: एकही डोस वाया न घालवण्याचा केरळने केला विक्रम

Corona Vaccination kerala vaccination pattern with zero wastage | Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

Corona Vaccination: लस वाया? अशक्यच! असा आहे लसीकरणाचा 'केरळ पॅटर्न'

Next

शिक्षण आणि आरोग्य या दोन अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रांत केरळ राज्य नेहमीच देशात अग्रेसर राहिले आहे. कोरोनाकहरातही केरळने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्तम कामगिरी बजावली आहे. जेव्हा देशभरातील राज्ये या ना त्या कारणाने लसमात्रा वाया घालवत होते तेव्हा केरळने एकही लसमात्रा वाया न घालवण्याचा विक्रम नोंदवला.

हे कसे शक्य झाले?
लसींच्या वापराचे सुनियोजित व्यवस्थापन आणि वेळेचे नियोजन या दोन सूत्रांमुळे हे शक्य झाले.
उदाहरणार्थ, एखाद्या लसीकरण केंदरात १०० लोकांचे लसीकरण करायचे असेल तर त्यातून ज्यांना दुसरा डोस द्यायचा आहे, अशा ७०-८० लोकांची निवड करायची आणि उर्वरितांना पहिला डोस द्यायचा.
डोस देताना प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने लसी वाया जाण्याचे प्रमाण शून्य राहिले.

वेळेचे नियोजन
आवश्यक तेवढ्याच डोसचा वापर केरळात केला जातो.
लसीची कोणतीही कुपी उघडल्यानंतर चार तासांत ती १० जणांना द्यावी लागते.
चार तासांनंतरही कुपी उघडीच राहिली तर त्यातील लस वाया जाते.
त्यामुळे लसीकरण केंद्रात १० जण आल्यानंतरच आरोग्य कर्मचारी लसकुपी उघडतात.
असे केल्याने उद्दिष्ट साध्य होते आणि लस वायाही जात नाही.

लसीकरणाचे केरळ मॉडेल असे...
कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन यांच्या ५एमएलच्या एका कुपीत लसीचे १० डोस असतात.
म्हणजेच एका कुपीद्वारे १० जणांचे लसीकरण केले जाऊ शकते.
कुपीतील लस कमी होऊ नये यासाठी लसनिर्मात्या कंपन्या कुप्यांमध्ये अतिरिक्त डोसही टाकतात.
त्यामुळे अतिरिक्त दोघांना डोस देता येऊ शकतात.
केरळमधील लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी प्रशिक्षित असल्याने अतिरिक्त डोस तयार करून ते अधिकाधिक लोकांचे लसीकरण करत आहेत.

लसीचा एकही डोस वाया न घालवणाऱ्या या केरळ प्रारूपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे.

केरळला आतापर्यंत ७३,३८,८०६ लसींचा पुरवठा झाला आहे.
त्यातून केरळने ७४,२६,१६४ मात्रा लोकांना दिल्या

याचा अर्थ केरळने ८७,३५८ अतिरिक्त लसीकरण केले

१ टक्के सुद्धा केरळने लसमात्रा वाया घालवल्या नाहीत

Web Title: Corona Vaccination kerala vaccination pattern with zero wastage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.