नवी दिल्ली - देशाताल कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. वेगाने लसीकरण सुरू आहे. भारतात दर दिवशी सरासरी 30 लाख 93 हजार 861 जणांचं लसीकरण सुरू आहे. कोरोना लसीकरणासाठी जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं म्हणून केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. लोकांनी स्वतः पुढे येत कोरोना लस (Corona Vaccine) घ्यावी यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. देशातील लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. अनेक कोरोना लसीकरण केंद्रावर नागरिकांना काही भेटवस्तू दिल्या जात आहेत. याच दरम्यान देशातील एका लसीकरण नागरिकांना केंद्रावर जबरदस्त ऑफर देण्यात आली आहे.
छत्तीसगड राज्यातल्या बीजापूर जिल्हा प्रशासनाने लोकांनी कोरोना लस घेण्यासाठी पुढाकार घ्यावा म्हणून एक शक्कल लढवली आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने "लस घ्या आणि दोन किलो टोमॅटो मोफत मिळवा" असं अभियाना सुरू केलं आहे. या अभियानाअंतर्गत कोरोनी लस घेतल्यानंतर नागरिकांना 2 किलो टोमॅटो मोफत दिले जात आहेत. सध्या 45 वर्षांवरील लोकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. टोमॅटोसाठी का होईना लोकांनी लसकरण केंद्रावर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी पुरूषोत्तम सल्लूर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला (ANI) याबाबत माहिती दिली आहे.
"बीजापूर जिल्ह्यातल्या ज्या-ज्या रुग्णालय आणि केंद्रांतून कोरोनाची लस दिली जात आहे त्या सर्व केंद्रांवर लस घेणाऱ्याला 2 किलो टोमॅटो (2 Kg Tomatos) मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. त्यामुळे लोक लसीकरणाकडे आकर्षित होत आहेत. आम्ही भाजी विक्रेत्यांना आवाहन केलं आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांना टोमॅटोचा पुरवठा करत आहेत" अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. केंद्र मोदी सरकारने देखील कोरोना लसीसकरणासंदर्भात देशपातळीवर एक स्पर्धा सुरू केली आहे. ज्यामध्ये कोरोना लस घेणाऱ्याला मोदी सरकार 5000 रुपये देणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी काही नियम आहेत तसेच प्रोसेस देखील आहे.
भारीच! कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार 5000 रुपये; पण करावं लागणार 'हे' खास काम
केंद्र सरकारच्या mygov.in या वेबसाईटवर या कोरोना लसीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या स्पर्धेत ती प्रत्येक व्यक्ती भाग घेऊ शकते, ज्या व्यक्तीने कोरोना लस घेतली आहे. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने कोरोना लस घेतल्यानंतर फक्त एक काम करावं लागणार आहे. कोरोना लस घेताना फोटो काढावा लागेल आणि त्यासोबत लसीकरणाचं महत्त्वं सांगणारी एक मस्त टॅगलाईन द्यावी लागेल. ज्यामुळे लोकांना प्रेरणा मिळेल. तुम्हाला mygov.in वेबसाइटवरील या लिंकवर लॉग इन करावं लागेल. त्यानंतर तिथे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व माहिती भरा. तुमचा हा फोटो आणि टॅगलाईन पाठवा. सरकार या सर्व फोटो आणि टॅगलाइनमधून उत्तम असा फोटो आणि टॅगलाइनची निवड करेल.