मुंबई: जगातील तब्बल ५५.५ कोटी कर्मचाऱ्यांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या २० कोटी विद्यार्थ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातील भारतातील बेरोजगारीचा दर २७.१ टक्क्यांवर जाऊन पोहोचला. तर मार्च ते एप्रिल या कालावधीत तब्बल १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला. कोर्सेरा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मनं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.कोरोनामुळे ३.७५ कोटी विद्यार्थी शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊ शकत नाही. त्यामुळे विविध कौशल्य आत्मसात करून विद्यार्थी शिक्षणाशी सुसुंगत राहण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती कोर्सेरानं दिली. 'अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी संस्थांनी कौशल्स विकासावर भर द्यावा. त्यामुळे लोक कामावर परतताच ते सुरळीतपणे काम सुरू करू शकतील', असा दावा कोर्सेरानं केला.व्यवसाय, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सशी संबंधित कौशल्यं येत्या काळात अतिशय उपयुक्त ठरतील, असा दावा कोर्सेरानं केला आहे. 'सरकारं, कंपन्या आणि कॅम्पस यांच्याकडून होणाऱ्या दोन तृतीयांश नोंदण्या व्यवसाय, तंत्रज्ञान आणि डेटा सायन्स कोर्सेसशी संबंधित आहेत,' अशी माहिती कोर्सेरानं दिली.डेटा स्किल कमी असल्यानं देशाला दरवर्षी ३३२ बिलियनचा फटकाडेटा स्किल्सच्या बाबतीत भारत कमी पडतो. त्यामुळे भारतीय कंपन्यांना दरवर्षी ३३२ बिलियनचा फटका बसतो, अशी माहिती ऍकसेंचर आणि क्यूलिकच्या अहवालातून समोर आली आहे.भारत डेटा सायन्स स्किलमध्ये, विशेषत: डेटा व्यवस्थापनात मागे पडतो. याबाबतीत भारत जगात ५१ व्या (मागे पडण्याच्या बाबत) स्थानी आहे. तर डेटा व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेत देशाचा क्रमांक जगात ५८ वा आहे. भारत यामध्ये नायजेरिया, फिलिपिन्सपेक्षा थोडा पुढे असल्याचं कोर्सेराचा अहवाल सांगतो. आत्मविश्वास, तणाव व्यवस्थापन अशा वैयक्तिक कौशल्यांच्या मागणीत १२०० टक्क्यांची वाढ झाल्याची आकडेवारीदेखील अहवालात आहे.व्यवसाय तंत्रज्ञानात भारताची आघाडीव्यवसाय आणि तंत्रज्ञान कौशल्यात भारत चीनपेक्षा पुढे आहे. याबाबतीत भारताला उदयोन्मुख गटात (जगात ३४ वा क्रमांक) स्थान मिळालं आहे. तर चीन ४५ व्या स्थानी आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातही भारताचा समावेश उदयोन्मुख गटात असून देश जगात ४० व्या क्रमांकावर आहे. यातही भारतानं चीनला मागे टाकलं आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन ५० व्या स्थानी आहे.
CoronaVirus News: 12 कोटी भारतीयांनी गमावली नोकरी, 'ही' कौशल्यं पुन्हा मिळवून देतील रोजगार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 8:16 PM