coronavirus : इराणमध्ये अडकलेले 277 भारतीय मायदेशी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 08:51 AM2020-03-25T08:51:27+5:302020-03-25T08:59:09+5:30
कोरोना विषाणूमुळे भारतासोबत जागासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे.
नवी दिल्ली - चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण मानवजातीसमोर गंभीर आव्हान उभे केले आहेत. चीननंतर इटली, स्पेन, इराण या देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, कोरोनामुळे इराणमध्ये निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीमुळे तिथे 277 भारतीय नागरिक अडकून पडले होते. दरम्यान, या सर्व भारतीयांना रात्री विमानाने देशात परत आणण्यात आले.
Mahan Air flight carrying 277 Indian passengers landed at Delhi airport today early morning from Tehran, Iran. #COVID19pic.twitter.com/F46nHAc0Dm
— ANI (@ANI) March 25, 2020
दरम्यान, कोरोना विषाणूमुळे भारतासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आजपासून 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे.