CoronaVirus: दिल्लीत सरोज हॉस्पिटलमध्ये ८० डॉक्टर्स कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:12 AM2021-05-11T06:12:33+5:302021-05-11T06:12:52+5:30
हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. ए. के. रावत यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतसुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसते. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नागरिकांना प्राण गमावावा लागत आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील सरोज हॉस्पिटलमध्ये जवळपास ८० डॉक्टर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या रुग्णालयातील बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) बंद करण्यात आली असून पॉझिटिव्ह ८० डॉक्टर्सपैकी १२ जण रुग्णालयात दाखल आहेत. इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. ए. के. रावत यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीतसुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसते. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्यामुळे नागरिकांना प्राण गमावावा लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.
यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. दिल्लीत गेल्या काही दिवसांत १३ हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर २७३ जणांचा मृत्यू झाला. दिल्लीत सध्या जवळपास ८६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.