Coronavirus: ‘मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनतेने का ऐकावं?’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 11:27 AM2020-03-25T11:27:41+5:302020-03-25T11:32:36+5:30
मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.
लखनऊ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचं घोषित केले आहे. लोकांनी घराबाहेर पडू नका, ही कोरोनाविरुद्ध लढाई आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केले. पण त्यांचे आवाहन त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून न पाळल्याने विरोधकांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
बुधवारी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला पोहचले. अयोध्येत प्रभू रामाची मूर्ती टेंटमधून हटवून तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आली. राम मंदिराच्या निर्माणानंतर रामाची मूर्ती त्याठिकाणी स्थापित केली जाईल. यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टीका केली. उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या ३५ वर पोहचली आहे.
उत्तरप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू यांनी सांगितले की, नवरात्रीचा पहिला दिवस आहे. देवीच्या दर्शनाला जाण्याची माझीही इच्छा होती. पण पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्याचं पालन करायला हवं. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांचे ऐकत नाहीत. आदित्यनाथ यांनी गर्दीसह देवीचं दर्शन घेतलं मग उत्तर प्रदेशातील जनता पंतप्रधानांचे का ऐकेल? असा सवाल त्यांनी केला आहे.
नवरात्रि का पहला दिन हैं,मां के दरबार में दर्शन के लिए जाना मेरी भी हार्दिक इच्छा हैं लेकिन मैंने प्रधानमंत्री जी की बात मानी।
— Ajay Kumar Lallu (@AjayLalluINC) March 25, 2020
उप्र के मुख्यमंत्री जी नहीं मानते,भीड़ के साथ दर्शन कर रहे हैं तो ऐसे में कैसे उप्र की जनता प्रधानमंत्री जी की बात मानें?#CoronaPandemicpic.twitter.com/ARaWDSfKwn
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. घराबाहेर पडू नका, तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक लक्ष्मणरेषा ओढण्यात आली आहे. ती ओलांडू नका. घरातच राहावे. तुमचे घराबाहेर पडणारे एक पाऊल, काही लोकांच्या निष्काळजीपणाने, काहींच्या गैरसमजुतीने, तुम्हाला, तुमच्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि पूर्ण देशाला अत्यंत कठीण स्थितीत नेईल. घराबाहेर पडणारे तुमचे एक पाऊल कोरोनासारख्या गंभीर रोगाला तुमच्या घरात आणू शकते. कर्फ्यूच पण जनता कर्फ्यूपेक्षा कठोर हा एक प्रकारचा कर्फ्यूच आहे. एवढे २१ दिवस लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर देश, तुमचे कुटुंब २१ वर्षे मागे जाईल. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर तुमच्या कुटुंबातील सदस्य या नात्याने मी हे सांगत आहे. तेव्हा २१ दिवस घराबाहेर पडणे विसरून जा. लॉकडाऊनचा २१ दिवसांचा अवधी खूप आहे. आपणास आर्थिक नुकसानही सोसावे लागेल. तुमचे जीवन, तुमचे कुटुंब, मित्रपरिवार आणि देशासाठी असे करणे जरूरी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
आनंदाची बातमी! राज्यातील कोरोनाचे पहिले दोन रुग्ण बरे झाले; हॉस्पिटलमधून आज डिस्चार्ज मिळणार
भारतातील रेल्वे १९७४ नंतर प्रथमच झाली बंद!, युद्धकाळातही सुरू होत्या गाड्या
'...तरीही लोक घराबाहेर दिसल्यास आता गोळ्या घालण्याशिवाय पर्याय नाही'
रिकाम्या हॉस्टेलमध्ये क्वारंटाइन सुरू करण्यास परवानगी द्या - केंद्रीय आरोग्य मंत्रालय
coronavirus ; कोरोनामुक्त रुग्ण म्हणाला, 'अग्निपरिक्षा पार पडली'