नवी दिल्लीः देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून, सरकारही त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कोरोनाच्या काळातही राजकीय नेते आरोप-प्रत्यारोप करत सुटले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशातल्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी लाखो कोटींचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द का केला नाही?, असा थेट सवालच राहुल गांधींनी मोदी सरकारला विचारला आहे. त्यावरूनच आता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. देश कोरोनाच्या संकटाशी लढतोय. मात्र काँग्रेस पक्षाला मोदी सरकारवर टीका करण्याशिवाय काहीही दिसत नाही, असं म्हणत जावडेकरांनी थेट राहुल गांधींवर घणाघात केला आहे. ज्या पद्धतीनं सध्या काँग्रेस नेते वागत आहेत, त्याचं उत्तर त्यांना कधीतरी द्यावंच लागेल, असा इशाराही जावडेकरांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांना दिला आहे. कोट्यवधी रुपयांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला आणि केंद्रीय व्हिस्टा सौंदर्यीकरण परियोजना यांसारख्या योजना रद्द करण्याऐवजी कोरोनाशी लढणाऱ्या केंद्रीय कर्मचारी, पेन्शन धारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात (DA) कपात करणं हा सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे, असं राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलं आहे. देशातील १ कोटी १३ लाख विद्यमान व माजी केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुढील दीड वर्ष महागाई व दिलासा भत्त्यावर पाणी सोडावे लागणार आहे. या निर्णयामुळे २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये केंद्र सरकारची ३७ हजार ५३० कोटी रुपयांची बचत होणार आहे.
आणखी हेसुद्धा वाचा
मोठा दिलासा; देशात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग 3 दिवसांवरून 10 दिवसांवर
Coronavirus : आता बँकांना ६ महिन्यांपर्यंत करता येणार नाही संप, सरकारनं बनवला कायदा
Coronavirus : मोदी सरकार दुसरं मोठं पॅकेज देण्याच्या तयारीत; 48 तासांमध्ये होऊ शकते घोषणा
Coronavirus : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून स्वामित्व योजनेची घोषणा, गावागावांना होणार जबरदस्त फायदा
CoronaVirus : "कर्मचारी अन् जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द करायला हवा"