ठळक मुद्देकाल ५ जूनला ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे.
नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या लोक नायक भवन या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर ईडीचे मुख्यालय सील करण्यात आले आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काल ५ जूनला ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठी उद्यापर्यंत हे मुख्यालय सील असणार आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.