गुवाहाटी : मुंबईहून आसामला नुकत्याच परतलेल्या नागरिकांपैकी सामुंबईहून बसने काही दिवसांपूर्वी आसाममध्ये आलेल्या सर्व लोकांना गुवाहाटी येथील क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले. गुवाहाटीमध्ये गुरुवारी कोरोनाचे २२ नवे रुग्ण आढळून आले, त्यात मुंबईहून आलेल्या सात जणांचा समावेश आहे. त जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले. त्यामध्ये हृदयविकाराचा त्रास असलेल्या १३ वर्षे वयाच्या मुलाचाही समावेश आहे. ईशान्य भारतातील आठपैकी पाच राज्ये काही दिवसांपूर्वीच कोरोनामुक्त झाली होती. मात्र कोरोनाने या प्रदेशात पुन्हा डोके वर काढले आहे.या शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या फॅन्सी बाझारमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याने तो भाग सील करण्यात आला आहे. गुवाहाटीमध्ये निर्बंध अधिक कडककरण्यात आले आहेत.आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिश्व सरमा यांनी सांगितले की, आसाममध्ये आतापर्यंत अन्य राज्यांतून ४ हजारपेक्षा जास्त लोक परत आले आहेत. त्यातील १२ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे चाचणीत आढळून आले. बॉलिवूडमधील गायक झुबीन गर्ग व त्याची पत्नी हे आणखी चार जणांसह मुंबईहून बसने आसामला आले. त्यापैकी कोणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचे निदर्शनास आले. (वृत्तसंस्था)
coronavirus: मुंबईहून आसामला परतलेल्या सात जणांना कोरोनाची लागण, ईशान्य भारताचा संसर्गाशी लढा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:29 AM