CoronaVirus: लॉकडाऊनमध्ये ढील देणं 'या' राज्याला पडलं महागात, २४ तासांत ५०० रुग्ण सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:39 PM2020-05-19T16:39:16+5:302020-05-19T16:40:55+5:30
विशेष म्हणजे या दिलेल्या सवलतीमुळे दिल्लीत 24 तासांत 500 नवे रुग्ण सापडले आहेत.
नवी दिल्लीः राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसला थोपवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण दिल्लीतले मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी लॉकडाऊनमधून नागरिकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार काही प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सुरू केली आहे. दिल्लीमध्ये लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणे आवश्यक असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. विशेष म्हणजे या दिलेल्या सवलतीमुळे दिल्लीत 24 तासांत 500 नवे रुग्ण सापडले आहेत.
ही आतापर्यंतची दिल्लीत रुग्ण सापडल्याची सर्वात मोठी आकडेवारी आहे. आतापर्यंत दिल्लीत एकूण कोरोना रुग्णांची संख्या 10554वर गेली आहे. यापैकी 5638 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच कोरोनामुळे 166 जणांनी आपला जीव गमावला आहे. दिल्लीत लॉकडाऊन उघडण्यात घाई तर नाही होत आहे, असे केजरीवालांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, सध्या कोरोनाबरोबर जगायला आपण शिकलं पाहिजे. कारण त्यावर कोणताही उपचार अद्याप सापडलेला नाही. दिल्लीत लॉकडाऊनमध्ये हळूहळू सूट दिली जात आहे.
पण मेट्रो, मॉल, हॉल सध्या बंदच ठेवण्यात आले आहेत. आतापर्यंत दिल्लीमध्ये 1,45,854 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ज्या भागात रुग्ण सापडले, त्या भागांना दिल्ली सरकारने हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहे. दिल्लीत आता एकूण 70 कोरोना कंटेन्मेंट झोन आहेत. दिल्ली पोलिसांच्या मदतीने दिल्ली सरकारने या भागांना पूर्णपणे सील केले आहे. कोणताही बाह्य मनुष्य कोणत्याही कोरोना कंटेन्ट झोन किंवा कोरोना हॉटस्पॉटमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्याचप्रमाणे या कंटेन्मेंट झोनमध्ये राहणारे लोकही या भागातून बाहेर येऊ शकत नाहीत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: नियमांत बदल! कामाच्या ठिकाणी थुंकल्यास होणार शिक्षा अन् भरावा लागणार जबर दंड
CoronaVirus: लसीशिवाय 'या' नव्या औषधानं ठीकठाक होतायत कोरोनाचे रुग्ण; चीनच्या प्रयोगशाळेचा दावा
Coronavirus: रेकॉर्ड ब्रेक उसळीनंतर सोन्याच्या भावात घसरण; जाणून घ्या आजचा दर
'त्या' संकटांनं केलं भीषण स्वरूप धारण, मोदी अन् शहांनी घेतला परिस्थितीचा आढावा
धक्कादायक! चीनच्या दबावाखाली येत नेपाळनं बनवला नकाशा अन् भारताच्या भागावर दाखवला 'कब्जा'
जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय; ढवळाढवळ करणार नाही, तालिबान्यांनी पाकिस्तानचे कान टोचले
CoronaVirus : लढ्याला यश! दोन औषधांनी ४ दिवसांत ६० कोरोनाबाधित रुग्ण झाले ठणठणीत
CoronaVirus: चीनमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार; इम्युनिटी कमी असलेल्या वयोवृद्धांचा धोका वाढणार