Coronavirus: ...म्हणून दुसऱ्या लाटेत दररोज सापडले तीन लाखांहून अधिक रुग्ण, तज्ज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 03:13 PM2021-06-04T15:13:30+5:302021-06-04T15:15:56+5:30

Coronavirus in India: गेल्या तीन महिन्यांपासून  देशात धुमाकूळ घातल असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे देशात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ही लाट सर्वोच्च पातळीवर असताना देशात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. काही वेळा ही रुग्णसंख्या चार लाखांपर्यंतही पोहोचली होती.

Coronavirus: Due to covid-19 delta variant more than three lacks patients found every day in the second wave of Coronavirus in India | Coronavirus: ...म्हणून दुसऱ्या लाटेत दररोज सापडले तीन लाखांहून अधिक रुग्ण, तज्ज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण  

Coronavirus: ...म्हणून दुसऱ्या लाटेत दररोज सापडले तीन लाखांहून अधिक रुग्ण, तज्ज्ञांनी सांगितले धक्कादायक कारण  

Next
ठळक मुद्देभारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमागचं सर्वात मोठं कारण हे डेल्टा व्हेरिएंट (B.1.617) होताहा व्हेरिएंट आणि त्याचा सब-लिनिएज (B.1.617.2) मुळेच भारतात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झालीडेल्टा व्हेरिएंट हा त्याआधी मिळालेल्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ५० टक्के अधिक संसर्गजन्य आहे

नवी दिल्ली - देशात आलेली कोरोना विषाणूच्या संसर्गाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या दुसऱ्या लाटेने दिलेल्या जखमा अजूनही भळभळत्या आहे.  (Coronavirus in India) गेल्या तीन महिन्यांपासून  देशात धुमाकूळ घातल असलेल्या दुसऱ्या लाटेमुळे देशात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ही लाट सर्वोच्च पातळीवर असताना देशात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. काही वेळा ही रुग्णसंख्या चार लाखांपर्यंतही पोहोचली होती. दरम्यान, भारतात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट चारपट अधिक मोठी असण्याचे आणि दररोज तीन लाखांहून अधिक रुग्ण सापडण्यामागचे धक्कादायक कारण तज्ज्ञांनी सांगितले आहे. (Due to covid-19 delta variant more than three lacks patients found every day in the second wave of Coronavirus in India)

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमागचं सर्वात मोठं कारण हे डेल्टा व्हेरिएंट (B.1.617) होता. हा व्हेरिएंट आणि त्याचा सब-लिनिएज (B.1.617.2) मुळेच भारतात दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. डेल्टा व्हेरिएंट हा त्याआधी मिळालेल्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ५० टक्के अधिक संसर्गजन्य आहे. 

ही माहिती नॅशन सेंटर फॉर डिजीज कंट्रोल (एनसीडीसी) आणि आयएनएसएसीओजी च्या संशोधकांनी संशोधनामधून समोर आणली आहे. यूकेमध्ये सापडलेल्या अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट ५० टक्के अधिक वेगाने पसरतो. चाचणी घेण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंटची टक्केवारी जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात २० टक्के आणि मार्च महिन्यात ४० टक्क्यांपर्यंत वाढली होती. 
 
डेल्टा व्हेरिएंटचे सब-लिनिएज बी.१.६१७.२ मध्ये ई४८४क्यू म्युटेशन नव्हते. मात्र टी४७८के आला होता. नमुन्यांमध्ये याचे प्रमाण अधिक दिसून आले. जसजसा पॉझिटिव्हिटी रेट वाढला. तसतसे याचे प्रमाणही वाढत गेले. अल्फा व्हेरिएंटचा केस फॅटिलिटी रेश्यो डेल्टाच्या तुलनेत अधिक होता. मात्र संशोधन सांगते की, सध्यातरी सीएफआरमधील बदल बी.१.६१७.२ शी थेट संबंध असल्याचे पुरावे मिळालेले नाहीत. 

डेल्टा व्हेरिएंट सर्व राज्यामध्ये सापडला. मात्र याचा सर्वाधिक संसर्ग दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगाणा आणि ओदिशामध्ये दिसून आला. लसीकरणानंतर होणाऱ्या संसर्गामध्येही याची भूमिका होती. बी.१.६१७ या व्हेरिएंटचा पहिला रुग्ण गतवर्षी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सापडला होता. त्याला डबल म्युटेशन व्हेरिएंट म्हटले गेले. आतापर्यंत हा व्हेरिएंट जगातील ६० हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. हा व्हेरिएंट अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक पसरतो. तसेच यावर होणाऱ्या लसीच्या परिणामाबाबतही डब्ल्यूएचओने अद्याप फार काही सांगितलेले नाही.  
 

Web Title: Coronavirus: Due to covid-19 delta variant more than three lacks patients found every day in the second wave of Coronavirus in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.