coronavirus: खराब सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरणे पडले महागात, सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, एक जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 12:19 PM2021-04-30T12:19:43+5:302021-04-30T12:20:11+5:30

coronavirus in India :

coronavirus: Expensive to fill oxygen in bad cylinder, one killed, one injured in cylinder explosion | coronavirus: खराब सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरणे पडले महागात, सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, एक जखमी 

coronavirus: खराब सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरणे पडले महागात, सिलेंडरचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू, एक जखमी 

Next

कानपूर - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत बेसुमार रुग्णवाढ होत असून, यामधील अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. त्यामुळे मेडिकल ऑक्सिजनची गरज भासत आहे. वाढत्या मागणीचा पुरवठा करताना उत्पादकांवरही मोठा ताण येत आहे. दरम्यान, काही लोक संकटाच्या या काळात नफेखोरी करण्याच्या नादात लोकांच्या जीविताशी खेळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार काहीजण अधिक नफा कमावण्यासाठी काही सिलेंडर व्यावसायिक ऑक्सिजन भरण्यासाठी खराब सिलेंडरचाही वापर करत आहेत. त्यामुळे धोका वाढत आहेत. खराब सिलेंडरमुळे झालेल्या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. 

ही दुर्घटना कानरपूरमधील पनकी फॅक्ट्री परिसरात घडली आहे. इथे सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरताना या सिलेंडरचा स्फोट झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर अन्य एक व्यक्ती जखमी झाली. या स्फोटाची तीव्रता एवढी जास्त होती की, त्यामुळे कारखान्याचे छतही उडाले.  

 दरम्यान, या स्फोटाची महिती मिळताच गोविंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. तर मृत व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे. सध्या स्फोट झाल्यामुळे सध्या हा ऑक्सिजन प्लँट बंद ठेवण्यात आला आहे.  

Web Title: coronavirus: Expensive to fill oxygen in bad cylinder, one killed, one injured in cylinder explosion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.