CoronaVirus News: कोरोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; जाणून घ्या निष्कर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 04:13 PM2020-07-26T16:13:33+5:302020-07-26T16:32:35+5:30
CoronaVirus News: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड कोवॅक्सिन तयार करत आहेत.
मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनावर लस नेमकी कधी येणार, याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या चाचणीचे निष्कर्ष अपेक्षेनुसार आहेत.
हरयाणातल्या रोहतकमधल्या मेडिकल सायन्सेस पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूटमध्ये (पीजीआय) शनिवारी कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती चाचणी घेणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या प्रमुख डॉ. सविता वर्मा यांनी दिली. पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात ६ जणांना लस देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लसीची पहिल्या टप्प्यातली चाचणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण भारतात ५० जणांना लस टोचण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत, असंदेखील वर्मा यांनी म्हटलं.
कोरोनावरील कोवॅक्सिन लसीच्या पहिल्या मानवी चाचणीला १७ जुलैपासून सुरुवात झाली. त्या दिवशी पीजीआय रोहतकमध्ये तीन जणांना लस देण्यात आली. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. त्यामुळे भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोवॅक्सिनसोबतच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरील लसीचीही मानवी चाचणी सुरू आहे. त्या चाचणीचे परिणामदेखील उत्साहवर्धक आहेत. लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत असून अँटीबॉडीज तयार होत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचला आहे. यापैकी ३२ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ लाख ८५ हजार ५७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४ लाख ६७ हजार ८८२ जणांवर उपचार सुरू आहेत.
'तो' फक्त आणि फक्त मास्क लावून घराबाहेर पडला, रस्त्यावर फिरला अन्...
माझं वय 85 नाही, पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवारांचं मिश्कील उत्तर
शिवराज सिंह चौहान रुग्णालयात; असा आला पत्नी, मुलांचा कोरोना रिपोर्ट
दररोज पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल - भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर