कोरोनासोबत युद्धाची तयारी, शाहंकडून लसीकरणाचा आढावा; BMCनंही जारी केलीय कडक नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 10:59 PM2021-02-22T22:59:54+5:302021-02-22T23:00:53+5:30

मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्री अमित शाह यांनी आढावाबैठकी दरम्यान कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणासंदर्भातही माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही आवश्यक सूचनाही केल्या.

Coronavirus fresh case Amit Shah review meeting Maharashtra BMC guidelines | कोरोनासोबत युद्धाची तयारी, शाहंकडून लसीकरणाचा आढावा; BMCनंही जारी केलीय कडक नियमावली

कोरोनासोबत युद्धाची तयारी, शाहंकडून लसीकरणाचा आढावा; BMCनंही जारी केलीय कडक नियमावली

Next

 
नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. यामुळे सरकारदेखील आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने प्रशासनाला कडक निर्देश दिले असून, नागरिकांनाही  सूचना दिल्या आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही आज अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. यातच आज गृह मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही गृह मंत्रालय आणि संबंधित विभागांसोबत आढावा बैठक घेतली. (Coronavirus fresh case Amit Shah review meeting Maharashtra BMC guidelines)

मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्री अमित शाह यांनी आढावाबैठकी दरम्यान कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी सुरू असलेल्या लसीकरणासंदर्भातही माहिती घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काही आवश्यक सूचनाही केल्या.

कोरोनाविरुद्धची लढाई... माझे कुटुंब माझी जबाबदारी ते 'मी जबाबदार'

देशात महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत कोरोना रुग्णांच्यासंख्येत वाढ होत असताना दिल्लीत मात्र कोरना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीतील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 1071 वरून 1041 वर आली आहे. तसेच दिल्लीतील कोरोना संक्रमण दरही 0.3 टक्क्यांवर आला आहे. तर रिकव्हरी दर 98.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

BMC ची गाईडलाइन -
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर बीएमसी कमिश्नर इकबाल सिंह चहल यांनी कडक निर्देश जारी केले आहेत. यानुसार, कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असलेल्या नव्या हॉटस्पॉटचे मॅपिंग करून तेथील जास्‍तीत जास्‍त चाचण्‍या केल्या जाणार आहेत. तसेच एका रुग्‍णामागे किमान 15 नजीकच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती शोधून त्‍यांना विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पाच बाधित रुग्ण आढळून असल्यास आता संपूर्ण इमारत सील  करण्यात येणार आहे. 

coronavirus: "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यातून कोरोना जाणार नाही, ते कोरोनाला जाऊ देणार नाहीत, कारण..."

महाराष्ट्र सरकारची सूचना - 
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध लावण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी रात्री समाज माध्यमांद्वारे नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी गर्दी होईल अशा सर्व धार्मिक, राजकीय-सामाजिक कार्यक्रम, यात्रांवर बंदी घालणार असल्याचे सांगितले. तसेच, पुढील आठवडाभर सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर, पाळली जाणारी शिस्त याचा आढावा घेऊन राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचे की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

CoronaVirus : चिंता वाढली! मुंबईत पुन्हा वाढतोय कोरोनाचा धोका, 71,838 कुटुंब असलेल्या 1305 इमारती सील!

मध्यप्रदेश सरकार अलर्ट मोडवर -
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारही अलर्ट मोडवर आले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवी अ‍ॅडव्हायझरी जारी करत म्हटले आहे, की महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग होईल. याच बरोबर विनामास्क दिसणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्यात यावी, असा आदेशही शिवराज सरकारने दिला आहे.
 

Web Title: Coronavirus fresh case Amit Shah review meeting Maharashtra BMC guidelines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.