बलिया – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे बहुतांश देशात लॉकडाऊन सुरु केला आहे. भारतातही गेल्या ३ आठवड्यांपासून लॉकडाऊन सुरु आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची संख्या २१ हजारांच्या वर पोहचली असून ७०० च्या वर लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ३ मे पर्यंत देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे.
अशातच लॉकडाऊन काळात सक्तीने लोकांना घरी राहण्यास भाग पडत आहे. विनाकारण घराबाहेर पडू नका असं वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे. जर अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर पडला तर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. कोरोनामुळे लोकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. अशा स्थितीत सरकारला आणखी एका गोष्टीची चिंता सतावत आहे.
भारताची लोकसंख्या हा सरकारच्या चिंतेचा विषय आहे. लॉकडाऊन काळात ही समस्या आणखी वाढू नये म्हणून सरकारने खबरदारी घेणे सुरुवात केली आहे. त्यासाठी यूपीच्या बलिया येथे आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन मोफक कंडोम वाटप करण्यात येत आहे.
लोकांनी कुटुंबनियोजन करावं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून घरोघरी कंडोम वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी कंडोम, माला-डी और कॉपर टी अशा विविध किट्सचं मोफत वाटप करत आहे. लॉकडाऊन दरम्यान वाढणारी लोकसंख्या सरकारसाठी अडचणीची ठरणार आहे.त्यासाठी हे अभियान चालवलं जात आहे. प्रत्येक गावोगावी, शहरात आशासेविका लोकांमध्ये जनजागरुकता करण्यासाठी जात आहेत.
याबाबत असिस्टेंट सीएमओ डॉक्टर वीरेंद्र प्रसाद यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे घरात बंदिस्त असणाऱ्या कपल्सना लॉकडाऊनमुळे मनोरंजनासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे सरकारदेखील त्रस्त आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जिल्हा प्रशासनाने प्रत्येक घरात कुटुंब नियोजनाच्या किट्स वाटण्याचा निर्णय घेतला आहे.
अन्य बातम्या...
CoronaVirus एक छदामही देणार नाही! निकृष्ट टेस्टिंग किटवरून भारताने चीनला सुनावले
चीनला किंमत मोजावीच लागेल! जगाला वेदना दिल्या, माणसे गमावली; अमेरिकेची धमकी
CoronaVirus कोरोनाचे बुमरँग! न्यूयॉर्कहून व्हायरस घुसल्याने चीनचे दुसरे 'वुहान' लॉकडाऊन
अमेरिकेने वाळीत टाकले, चीनने WHO साठी अख्खी तिजोरीच खुली केली
सावधान! आता पीएफ अॅडव्हान्स काढाल तर 10 वर्षांनी पस्तावाल
मुलगा झाला म्हणून अख्ख्या पंचक्रोशीत बत्ताशे, लाडू वाटले; निघाला कोरोना पॉझिटिव्ह