CoronaVirus News: मोठी बातमी!... शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला; मोदी सरकारने 'मास्टर प्लॅन'च आखला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 08:30 PM2020-05-25T20:30:42+5:302020-05-25T20:51:33+5:30

CoronaVirus : दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. 

CoronaVirus : government has prepared master plan for opening of schools master plan prepared vrd | CoronaVirus News: मोठी बातमी!... शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला; मोदी सरकारने 'मास्टर प्लॅन'च आखला

CoronaVirus News: मोठी बातमी!... शाळा उघडण्याचा मुहूर्त ठरला; मोदी सरकारने 'मास्टर प्लॅन'च आखला

Next
ठळक मुद्देपहिल्यांदा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शाळा उघडण्यात याव्यात, असा सरकारचा मानस आहे. दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. शाळा उघडण्यासाठी अधिकृतरीत्या गाइडलाइन या आठवड्याच्या अखेरपर्यंत जारी केली जाणार आहे.

नवी दिल्लीः केंद्र सरकार झोननुसार पुन्हा शाळा पुन्हा उघडण्याच्या विचारात आहे. पहिल्यांदा ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये शाळा उघडण्यात याव्यात, असा सरकारचा मानस आहे. पहिल्यांदा मोठ्या वर्गातील मुलांना शाळेत बोलवण्यात येणार आहे. दुसरीकडे आठवीपर्यंतच्या मुलांना घरातूनच अभ्यास करावा लागणार आहे. कारण ते पूर्णतः स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. 

शाळा उघडण्यासाठी अधिकृतरीत्या नियमावली या आठवड्याच्या अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्वच मंत्रालयांच्या सहमती मिळाल्यानंतर याला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. देशातील सर्वच शाळा १६ मार्चपासून बंद करण्यात आल्या आहेत. तेव्हापासून आतापर्यंत मध्ये दोन महिन्यांचा कालावधी लोटला. त्यामुळे शाळा आता कधी उघडणार याचीच सगळ्यांना काळजी लागून राहिली आहे. 

३० टक्के उपस्थितीनं उघडणार शाळा
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, शाळांना जुलैमध्ये उघडण्यात येणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेता ३० टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षित करण्यात येणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शाळा उघडणार असल्याचे संकेत दिले आहेत. पण त्यासाठी शाळा आणि कॉलेजमध्ये आधी सुरक्षेचे उपाय राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

यूजीसी आणि एनसीआरटी मिळून तयार करत आहेत मार्गदर्शक सूचना
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री म्हणाले की, यूजीसी आणि एनसीआरटी मिळून मार्गदर्शन सूचना तयार करत आहेत. शाळा, महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटीजसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे लागू केली जाऊ शकतात. शाळांमध्ये थर्मल स्कॅनर ठेवण्यात येणार असून, वर्गातील आसनव्यवस्थेतही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून मुलांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचीही योजना आहे. 

हेही वाचा

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण

Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर

हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त; नव्या संशोधनानुसार खुलासा

CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

Web Title: CoronaVirus : government has prepared master plan for opening of schools master plan prepared vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.