Coronavirus: ना वऱ्हाड, ना वाजंत्री; लग्नासाठी एकटाच आला नवरदेव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 06:22 AM2021-05-26T06:22:50+5:302021-05-26T06:24:26+5:30
Coronavirus: वर अरविंद याने वधू पूजा हिच्या भांगेत सिंदूर भरला आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत लग्नाचे विधी पार पाडले व तो पत्नीला सोबत घेऊन गेला.
- बलवंत तक्षक
चंदीगड : सात फेरे घेण्यासाठी नवरा मुलगा एकटाच गाडी चालवत आपली सासुरवाडी बेहडात दाखल झाला. कोरोना महामारीत हे लग्नहिमाचल प्रदेशच्या बिलासपूर जिल्ह्यातील बबैली गावात खूपच साध्या पद्धतीने झाले. वर अरविंद याने वधू पूजा हिच्या भांगेत सिंदूर भरला आणि कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत लग्नाचे विधी पार पाडले व तो पत्नीला सोबत घेऊन गेला.
कोरोना संचारबंदीत निर्बंधांचे पालन होत आहे की नाही याची पाहणी शिमला ग्रामीणचे नायब तहसीलदार एच. एल. गेज्टा यांनी चार ठिकाणी लग्न समारंभांत जाऊन केली. तेथे त्यांना ठरवून दिलेल्या संख्येपेक्षाही कमी उपस्थिती दिसली. एका लग्नात तर त्यांनी वर-वधूला आशीर्वाद देत पाच हजार रुपये भेटहीदिले.
लोकांचे जीव महत्त्वाचे
बबैली गावात अरविंद म्हणाला की, “जीव राहिला तर सगळे आहे.
महामारी संपल्यानंतर मित्र, नातेवाईकांना बोलावू, नाचू, गाऊ. ही वेळ आपल्या आनंदापेक्षा लोकांचे जीव वाचणे महत्त्वाचे आहेत.”