नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. जून महिन्यात दररोज ८ ते १० हजार रुग्ण आढळून येत आहेत. जवळपास दोन महिने लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पावणे तीन लाखांच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा साडे सात हजारांहून अधिक आहे. त्यामुळे आरोग्य मंत्रालयानं कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला आहे. देशात आतापर्यंत ५० लाख कोरोना चाचण्या झाल्या आहेत.भारतानं काल कोरोना चाचण्यांमधील ५० लाखांचा टप्पा पार केला. भारताआधी तीन देशांनी ५० लाख चाचण्या केल्या आहेत. त्यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटनचा समावेश आहे. अमेरिकेनं २.१८ कोटी, रशियानं १.१३ कोटी, तर ब्रिटननं ५९ लाख चाचण्या घेतल्या आहेत. चाचण्यांचा आकडा पाहिल्यास भारत ब्रिटनच्या जवळ आहे. मात्र अमेरिका, रशियाच्या खूप मागे आहे.कोरोना रुग्णांची संख्या, मृतांची आकडेवारी पाहताना सरासरी काढली जाते. देशाची लोकसंख्या यासाठी विचारात घेतली जाते. प्रति लाख किंवा प्रति १० लाखामागे किती रुग्ण, किती मृत्यू यावरून देशातल्या कोरोना संकटाची तीव्रता लक्षात येते. त्याच निकषानं पाहिल्यास ५० लाख चाचण्या घेणारा भारत जगातल्या पहिल्या १३० देशांतही येत नाही. वर्ल्डोमीटर्सनं दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रति १ लाख लोकसंख्यामागे सर्वाधिक चाचण्या घेणाऱ्या देशांच्या यादीत मोनॅकोचा पहिला क्रमांक आहे. प्रति एक लाख लोकसंख्यामागे मोनॅकोनं ४१,३०० नागरिकांच्या चाचण्या घेतल्या आहेत. यानंतर जिब्राल्टर (२७,५५२), यूएई (२५,६७०) या देशांचा क्रमांक लागतो. या यादीत डेन्मार्क (१३ व्या), स्पेन (१७ व्या), रशिया (२० व्या), ब्रिटन (२१ व्या), सिंगापूर (२७ व्या), अमेरिका (३० व्या) स्थानी आहेत. कोरोनामुक्त झालेला न्यूझीलंड या यादीत ३४ व्या क्रमांकावर आहे. वर्ल्डोमीटरनं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीपर्यंत झालेल्या चाचण्या विचारात घेतल्यास भारताचा जगात १३८ वा क्रमांक लागतो. शेजारी देश श्रीलंका भारताच्या पुढे आहे. पाकिस्तान १४० व्या स्थानी आहे. भारतानं एक लाख लोकसंख्येमागे ३५६ कोरोना चाचण्या केल्या आहेत. पाकिस्ताननं ३३१, तर बांगलादेश २५८ चाचण्या केल्या आहेत.मुंबईने 'जन्मदात्या' वुहानला मागे टाकले; दिल्ली दुसऱ्या नंबरवरखूशखबर! कोरोनाच्या ज्या औषधाला भारताने दिली मंजूरी, त्या औषधाने वैज्ञानिकांना मिळालं मोठं यश...
CoronaVirus News: कोरोना चाचण्यांमध्ये जगात भारताचा क्रमांक कितवा?; आकडेवारीनं वाढवली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 1:45 PM