नवी दिल्ली - देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीदेशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 21 हजारांवर गेला आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 21 हजार 393 वर पोहचली आहे. तर 681 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून यानंतर आता गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 5,649 रुग्ण असून गुजरातमधील रुग्णांचा आकडा वाढून संख्या 2,407 वर पोहोचली आहे. देशात बुधवारी एकूण 1,273 कोरोना रुग्ण आढळले. त्यांपैकी 52 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांमधील आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 431 तर गुजरातमध्ये 229 नवे रुग्ण आढळले. मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या शहरांमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे. राजस्थानात 153, उत्तर प्रदेशात 101 आणि दिल्लीत 92 नवे रुग्ण आढळले.
महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढत आहे. बुधवारी देशात कोरोनामुळे 39 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 31 म्हणजेच 79 टक्के रुग्ण केवळ महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत. बुधवारी महाराष्ट्रात 18 आणि गुजरातमध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला. तर, मुंबईत 10 आणि अहमदाबादमध्ये 9 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. महाराष्ट्रानंतर आता गुजरातचा क्रमांक लागला आहे. महाराष्ट्रात 269 रुग्णांचा, तर गुजरातमध्ये 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या 26 लाख 37 हजारांवर गेली असून, मृतांचा एकूण आकडा 1 लाख 84 हजारांच्या घरात पोहोचला आहे. तर आतापर्यंत जगभरात 7 लाख 17 हजार 635 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेत 47,676 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 848,994 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकेनंतर इटलीत सर्वाधिक मृत्यू झाले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 187,327 वर गेली आहे. तर तब्बल 25,085 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : 'भाजपा जातीय पूर्वग्रह आणि द्वेषाचा व्हायरस पसरवतोय', सोनिया गांधींचा हल्लाबोल
Coronavirus : ...म्हणून विद्यार्थ्यांसाठी रोज झाडावर चढतो 'हा' शिक्षक
Coronavirus : बापरे! 2 महिन्यांनंतरही शरीरात जिवंत आहे व्हायरस, ठीक झालेल्या रुग्णांना कोरोनाची लागण
Coronavirus : कोरोनाचा विळखा! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 26 लाखांवर, 184,217 जणांचा मृत्यू