CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! देशात किती टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2021 09:20 AM2021-04-21T09:20:21+5:302021-04-21T09:23:57+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे.

CoronaVirus Live Updates dr harshvardhan told how many percent of patients are in the country today on oxygen support | CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! देशात किती टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा कहर! देशात किती टक्के रुग्ण ऑक्सिजन सपोर्टवर?; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिलं उत्तर, म्हणाले...

Next

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 12,71,00,000 हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही 1.18 टक्के इतका कमी झाला आहे. 

दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर 1.93 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन  1.75 टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर 0.40 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे. सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर 4.29 टक्के रुग्ण होते. ते आता   4.03 टक्के इतके आहेत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. गेल्या वर्षी होम आयसोलेशनमध्ये 80 टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. यावर्षी कोरोना रुग्णांच्या उपचारात आपली सुरुवात चांगली आहे. पण आपल्याला आरोग्य सुविधा आणखी वाढवण्याची गरज आहे. आपण सध्या रुग्णालयामध्ये तात्पुरते बेड बनवत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

रुग्णालयामध्ये मनुष्यबळ वाढवण्यावरही आपण काम करत आहोत. एम्समध्ये अनेक असे डॉक्टर्स आहेत जे दुसऱ्या विभागांमध्ये काम करत आहेत. अनेक नर्सेस आहेत ज्यांनी गेल्या वर्षी करोनात थेट काम केले नाही. पण आता आपण मनुष्यबळ वाढवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देऊन कोरोनाच्या उपचारासाठी सक्षम बनवत आहोत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या संकटात रिलायन्सने मोठा दिलासा दिला आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना रिलायन्स राज्यांना दररोज तब्बल 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करत आहे. यामुळे 70 हजार रुग्णांचा जीव वाचणार आहे.

मोठा दिलासा! दररोज 700 टन ऑक्सिजनचा पुरवठा करतेय Reliance; तब्बल 70 हजार रुग्णांचा वाचणार जीव

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडे (Reliance Industries) आपल्या जामनगर ऑईल रिफायनरीमध्ये दररोज 700 टनांहून अधिक मेडिकल-ग्रेड ऑक्सिजन (Medical Oxygen) तयार करत आहे. कोरोनाच्या संकटात काही राज्यांना हे ऑक्सिजन विनाशुल्क दिले जात आहे. कोरोनामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन तयार करण्याचा निर्णय घेतला. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीने सुरुवातीला 100 टन वैद्यकीय दर्जाच्या ऑक्सिजनचे उत्पादन केले, जे आता त्वरित 700 टन करण्यात आले. कोरोनाचा सामना करत असलेल्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांसारख्या राज्यात पुरविल्या जाणाऱ्या पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. लवकरच कंपनीची वैद्यकीय ग्रेड ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवून 1000 टन करण्याची योजना आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates dr harshvardhan told how many percent of patients are in the country today on oxygen support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.