नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 111 दिवसांतील नीचांक आहे. कोरोनाबाबत आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 34 हजार 703 नवे रुग्ण आढळून आले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (6 जुलै) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 34,703 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. तर रिकव्हरी रेट हा 97.17 टक्क्यांवर पोहोचला आहे. देशात सलग आठव्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,64,357 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर लाखो लोक उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पंजाब, गोवा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातसह देशाती 10 मोठ्या राज्यांमध्ये आता कोरोनाचा वेग कमी झाला आहे. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, पश्चिम बंगाल, मिझोरम, तेलंगणा, जम्मू कश्मीर आणि झारखंडमध्ये कोरोना अद्यापही जीवघेणा ठरत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
धोका वाढला! कोरोनातून बरं झालेल्या रुग्णांमध्ये Bone deathची गंभीर समस्या; डॉक्टरांच्या चिंतेत भर
कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच विविध ठिकाणी संशोधन देखील सुरू आहे. याच दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एक गंभीर समस्या आढळून येत आहे. कोरोनावर मात केलेल्या काही रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस (Avascular necrosis- AVN) म्हणजेच बोन डेथ (Bone Death) ची समस्या पाहायला मिळत आहे. बोन डेथमध्ये शरीरातील हाडांवर गंभीर परिणाम होत आहे. बोन टिश्यूपर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होत नसल्याने एवॅस्कुलर नेक्रोसिसची गंभीर समस्या रुग्णांमध्ये निर्माण होत आहे. मुंबईतील 40 वर्षांहून कमी वय असलेल्या तीन रुग्णांमध्ये एवॅस्कुलर नेक्रोसिस आढळून आले आहेत. मुंबईत बोन डेथचे रुग्ण आढळून आल्याने ड़ॉक्टरांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच येत्या काही दिवसांत रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची भीती देखील डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.