CoronaVirus Live Updates : धक्कादायक! कोरोनाग्रस्ताला रुग्णालयानं दिलं 19 लाखांचं भलं मोठं बिल; 8 लाख भरले तरी दिला नाही मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 11:33 AM2021-05-31T11:33:39+5:302021-05-31T11:42:02+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे.
नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. जगभरातील रुग्णांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. याच दरम्यान रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीन विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र कधी कधी रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर येत आहे.
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही रुग्णालये ही कोरोनाग्रस्तांकडून अवाजवी पैसे घेत आहे. तसेच रुग्णांना उपचारानंतर भलं मोठं बिल देण्यात येत आहे. खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सूरु असल्याची भयंकर घटना समोर आली आहे. एका रुग्णालयाने कोरोना रुग्णाला तब्बल 19 लाखांचं बिल दिलं आणि 8 लाख दिल्यानंतर देखील मृतदेह देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण बिल न दिल्यामुळे रुग्णाचा मृतदेह देणार नसल्याचं खासगी रुग्णालयाने म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उन्नाव येथील अनिल कुमार यांच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.
CoronaVirus Live Updates : देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/tXIm8ieKq1
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
लखनऊच्या टेंडर पाम रुग्णालयात अनिल यांच्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर खासगी रुग्णालयाने तब्बल 19 लाखांचं बिल दिलं. अनिल यांनी आठ लाख रुपयांचं बिल भरलं. मात्र बाकीचं बिल अद्याप भरलेलं नाही. त्यामुळे रुग्णालयाने त्यांच्या पत्नीचा मृतदेह देण्यास नकार दिला आहे. माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर मी मृतदेह मागितला असल्यास रुग्णालयाने माझ्याकडे आणखी 10.75 लाख मागितले आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही अशी माहिती अनिल यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus Live Updates : दिलासादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून सुटका होणार; लसीकरणाचा वेगही वाढणार#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/H6ebTDzKS7
— Lokmat (@MiLOKMAT) May 31, 2021
मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 1,52,734 नवे रुग्ण; 50 दिवसांतील नीचांक
देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 50 दिवसांतील नीचांक आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 1,52,734 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,128 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,80,47,534 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,29,100 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी (31 मे) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1 लाख 52 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे.
CoronaVirus Live Updates : "देवाशिवाय आपण कुणीच नाही"; सर्वांना आपल्या घरी ईश्वराची प्रार्थना करण्याचं केलं आवाहन #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/nwtp5DuqKFpic.twitter.com/vEjlOiCUs0
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2021
CoronaVirus News : धक्कादायक! पतीपाठोपाठ झालं मुलाचंही निधन...मन सुन्न करणारी घटना #coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/JJbwfl5bKF
— Lokmat (@MiLOKMAT) May 29, 2021