नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कित्येक लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे एक हसतं-खेळतं घर काही दिवसांत उद्ध्वस्त झालं आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,33,40,938 वर गेली आहे. तसेच देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,48,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 4205 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,54,197 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
एका पित्याने कोरोनामुळे आपला दोन्ही मुलाला गमावलं आहे. एका मुलाचे अंत्यसंस्कार होत नाहीत. तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नोएडाच्या जलालपूर गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अतार सिंह यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे आपल्या डोळ्यासमोर दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. अतार सिंह यांचा मुलगा पंकज सिंह यांच निधन झालं. त्यानंतर आपल्या काही नातेवाईकांसोबत त्याचा अंत्यविधी करण्यासाठी अतार सिंह गेले. ते स्मशानभूमीतून परत आल्यावर त्यांच्या दुसऱ्या मुलाचंही कोरोनामुळे निधन झाल्याचं समजलं.
पहिल्या मुलाच्या निधनाच्या दुःखातून सावरतो ना सावरतो तोच दुसऱ्या मुलाचंही निधन झाल्याने अतार सिंह यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 महिला आहेत. या गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या सर्वांना आधी ताप आला आणि नंतर त्यांची ऑक्सिजन पातळी कमी-जास्त होत होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे अनेकांना आपल्या घरातील कर्ती व्यक्ती गमवावी लागली आहे. तर काही ठिकाणी संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाची लागण झाली असून अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाच्या संकटात अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबात पती आणि मुलाचा कोरोनामुळे मृत्य़ू झाला आहे. याच धक्क्याने महिलेने देखील आपला जीव सोडला. त्यामुळे चार दिवसांत एकाच घरातून तीन अंत्ययात्रा निघाल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या बालाघाट जिल्ह्यातील सिकंदरा गावामध्ये एकाच घरात चार दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 एप्रिल रोजी 31 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.