LockdownNews : लॉकडाउन 4.0साठी करण्यात आले 5 झोन; आता, बफर आन् कंटेन्मेंट झोनही असतील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 09:18 PM2020-05-17T21:18:37+5:302020-05-17T21:26:55+5:30
या पाचही झोनसंदर्भातील निर्णय राज्य सरकारे घेतील. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते. यात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनचा समावेश होता.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी मोदी सरकारने देशातील लॉकडाउन 31 मेपर्यंत वाढवला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर, या 'लॉकडाउन 4.0'साठी देशात एकूण 5 झोन तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोंन व्यतिरिक्त बफर आणि आणि कंटेन्मेंट झोनचाही समावेश करण्यात आला आहे.
या पाचही झोनसंदर्भातील निर्णय राज्य सरकारे घेतील. आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात केवळ तीन जोनच तयार करण्यात आले होते. यात रेड झोन, ग्रीन झोन आणि ऑरेंज झोनचा समावेश होता. कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ दैनंदिन आवश्यक सेवांनाच परवानगी असेल. गृह मंत्रालयाने रविवारी जारी केलेल्या गाइडलाइंसमध्ये यासंदर्भात माहती देण्यात आली आहे.
लॉकडाउन 4.0 दरम्यान, मेट्रो, लोकल, विमानसेवा बंदच राहील. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र विमानतळं मुख्य शहरांमध्ये येतात आणि त्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुरूच राहतील.
CoronaVirus News: WHOमध्ये भारताला मोठे पद; चीनवर निशाणा, भारतावर सर्वांच्या नजरा
शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातदेखील बंद राहणार आहेत. क्रीडा संकुलं आणि स्टेडियम उघडण्यात येतील. मात्र तिथे प्रेक्षकांना परवानगी नसेल. धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनादेखील परवानगी नसेल. राजकीय कार्यक्रमांचं आयोजनही करता येणार नाही.
CoronaVirus News : एका तासात 250 जणांची कोरोना तपासणी, टेस्टिंग किटपेक्षाही वेगवान श्वान!