LockdownNews : पायी अथवा ट्रकने येणाऱ्या मजुरांना उत्तर प्रदेशात 'नो एंट्री', योगी सरकारचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 09:33 PM2020-05-16T21:33:30+5:302020-05-16T21:34:34+5:30
उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी शुक्रवारी म्हणाले, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया अपघातावर दुःख व्यक्त करत, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे, की कुणालाही प्रवासी नागरिकाला पायी, अवैध अथवा असुरक्षित वाहनाने प्रवास करू देऊ नये.
लखनौ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू आहे. यामुळे, स्थलांतरित मजूर देशाच्या कानाकोपऱ्यातून जमेल त्या पद्धतीने आपापल्या गावी निघाले आहेत. मात्र, या मजुरांना आता उत्तर प्रदेशच्या सीमेत अवैध वाहनांनी, पायी अथवा दुचाकीने प्रवेश करता येणार नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. जारी करण्यात आलेल्या आदेशात योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे, की कुठल्याही प्रवासी नागरिकाला पायी, अवैध अथवा असुरक्षित गाडीने प्रवास करू देऊ नये.
आणखी वाचा - आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा
उत्तर प्रदेशचे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीश कुमार अवस्थी शुक्रवारी म्हणाले, 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी औरैया अपघातावर दुःख व्यक्त करत, सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश दिला आहे, की कुणालाही प्रवासी नागरिकाला पायी, अवैध अथवा असुरक्षित वाहनाने प्रवास करू देऊ नये.
अवस्थी म्हणाले, 'प्रवाशांसाठी प्रत्येक सीमेवरील जिल्ह्यात 200 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशात 449 रेल्वे आल्या आहेत. संपूर्ण देशात, ही सर्वात जास्त संख्या आहे. तब्बल 5 लाख 64 हजार लोकांनी या रेल्वेने प्रवास केला आहे. शनिवारीही 75 रेल्वे येणार आहेत. तसेच आणखी 286 रेल्वेंना परवानगी देण्यात आली आहे.
आणखी वाचा - धक्कादायक! कोरोना बरे झाल्यानंतरही सोडत नाही पिच्छा; चीनमधील डॉक्टरांनी दिला 'गंभीर' इशारा
अवैधरित्या येणाऱ्या प्रवाशांना 'नो एंट्री'!
अवस्थी म्हणाले, पूर्ण संख्या एकत्रित केली, तर 9 लाख 50 हाजर लोकांना आणण्यात आले आहे अथवा आणले जाणार आहे. आता, इतर राज्यांतून उत्तर प्रदेशच्या सीमेत पायी, दुचाकी वरून आणि ट्रकच्या माध्यमाने कुण्याही प्रवासी व्यक्तीला येण्याची परवानगी नसेल.
LockdownNews: राहुल गांधींनी घेतली स्थलांतरित मजुरांची भेट, रस्त्यावर बसूनच साधला संवाद
संरक्षण दलाची यंत्रसामग्री भारतातच बनवण्यावर भर', पण FDIची मर्यादा नेली 74 टक्क्यांवर!