आसनसोल: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनानं श्रमिक विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी परतू लागले आहेत. अशाच काही परप्रांतीय मजुरांनी त्यांना देण्यात आलेलं अन्न गाडीमधून प्लॅटफॉर्मवर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'महाराष्ट्रातून घरी परतणारे मजूर मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. घरी जायची सोय झाली तर महाराष्ट्राला शिव्या घालायला लागले. या परप्रांतीयांचा माज बघा,' असा मेसेजदेखील व्हिडीओसोबत पसरवला जात आहे.लोकमत डॉट कॉमनं या व्हिडीओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये हा व्हिडीओ परप्रांतीय मजुरांचा असल्याचं समोर आलं. मात्र हा व्हिडीओ महाराष्ट्रातला नाही. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधल्या आसनसोल रेल्वे स्थानकातला आहे. रेल्वे स्टेशनवरून निघत असताना मजूर त्यांना देण्यात आलेलं अन्न प्लॅटफॉर्मवर फेकत असल्याचं, मुर्दाबादच्या घोषणा देत असल्याचं यामध्ये दिसत आहे.
VIDEO: महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:43 PM