नवी दिल्ली : कोरनावरील औषधासंदर्भात मंगळवारी पतंजलीने दावा केला होता. यानंतर, आयुष मंत्रालयाने पतंजलीचा हा दावा गाभीर्याने घेत, कंपनीचा दावा आणि सायंटिफिक स्टडीसंदर्भात मंत्रालयाकडे कुठलीही माहिती पोहोचलेली नही, असे म्हटले होते. यावर, 'आम्ही मंजुरी घेऊनच क्लिनिकल ट्रायल केले', असे योगगुरू बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
एका वृत्त वाहिनीशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले, हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारे आणि आयुर्वेदाचा गौरव करणारे आहे. जो कम्युनिकेशन गॅप होता, तो दूर झाला आहे आणि Randomised Placebo Controlled Clinical Trialsचे जेवढे स्टॅन्डर्ड पॅरामीटर्स आहेत, ते सर्व 100% पूर्ण केले आहेत. यासंदर्भात आम्ही संपूर्ण माहिती आयुष मंत्रालयाला दिली आहे.
योगगुरू बाबा रामदेव म्हणाले, एवढे मोठे काम केले आहे, एवढेसे प्रश्न तर निर्माण होणारच, सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. हे सरकार आयुर्वेद विरोधी नाही. मंजुरी मिळाल्यानंतरच पुढच्या कामाला सुरुवात झाली. रजिस्ट्रेशन नंबरही देण्यात आला आहे. आम्ही क्लिनिकल ट्रालयसाठी सरकारने निर्धारित केलेल्या सर्व मापदंडांचे 100% पालन केले आहे. जे अप्रुव्हल घेणे आवश्यक होते, ते घेतले आहे. मला वाटते, थोडा कम्युनिकेशन गॅप होता. तो आता संपला आहे. आता यात काहीही दुमत नाही. यासंदर्भात आचार्य रामकृष्ण यांनीही एक ट्विट केले आहे.
CoronaVirus : खूशखबर!; भारतात कोरोनाच्या आणखी एका औषधाला मिळाली मंजुरी, 'गेम चेंजर' ठरण्याचा दावा
आम्हाला जाहिरात करण्याची आवश्यकता नाही. सध्या लाखो लोक हे औषध मागत आहेत. जाहिरात करण्याची आमची कसलीही इच्छा नाही. क्लिनिकल कंट्रोलच्या रिझल्ट्सची आम्ही घोषणा केली आहे. ते सर्वत्र प्रसिद्धही झाले आहे. 280 रुग्णांचा डेटाही आमच्याकडे आहे, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
आयुष मंत्रालयाने दिले आहेत जाहिरात न करण्याचे आदेश -देशात आणि जगभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी करोनावरील लस शोधण्यावर भर देण्यात येत आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लाँच केले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला आहे. मात्र पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यंत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहेत.
CoronaVirus News: "जगातील 'या' 170 कोटी लोकांना कोरोनाचा सर्वाधिक धोका", 'हे' आहे कार
आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने कोरोनावरील उपचारासाठी विकसित केलेल्या कोरोनिल औषधाची आम्ही दखल घेतली आहे. पतंजली कंपनीने या औषधाची योग्य ती माहिती द्यावी. तसेच पतंजलीने क्लिनिकल ट्रायल केल्याचा दावाही केला आहे. मात्र, त्याचे रिपोर्ट अद्याप आलेले नाहीत, असेही आयुष मंत्रालाने म्हटले आहे.