बंगळुरू - देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली, असून रुग्णांचा आकडा 18,55,746 वर गेला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 52,050 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 803 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 38938 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर आता कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते सिद्धरामय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. "माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांमध्ये काही लक्षणं आढळल्यास त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घ्यावं" असं त्यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. तसेच, त्यांनी आपल्या संपर्कातील सर्व लोकांना सेल्फ क्वारंटाइन होण्याचे आणि वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर, मुख्यमंत्र्यांच्या मुलीचा रिपोर्ट सुद्धा कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या दोघांनाही ओल्ड एअरपोर्ट रोड येथील मनिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 31 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याने त्यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमित शाह यांनी स्वत:च ट्विट करून आपणास संसर्ग असल्याचे नमूद केले. आपली प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने टेस्ट करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यातही कोरोनाच्या आजाराची काही लक्षणे असल्याचे डॉक्टरांना आढळून आले. मात्र कोणताही त्रास होत नसल्याने पुरोहित यांना घरीच एकटे (होम आयसोलेशन) राहण्याचा सल्ला डॉक्टरानी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Mumbai Rain Updates : घरीच थांबा! अतिवृष्टीमुळे कार्यालये बंद ठेवण्याचे पालिकेचे आवाहन
CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा
Sushant Singh Rajput Case: सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावर अमृता फडणवीसांनी केलं ट्विट, म्हणाल्या...
Sushant Singh Rajput Case: 'पालिका आणि पोलिसांना वेड लागलं वाटतं'; संजय निरुपम यांचा हल्लाबोल
Video - ...अन् पाकिस्तानी न्यूज चॅनलवर अचानक फडकला भारताचा झेंडा