Coronavirus : आठ राज्यांतील 'या' 13 जिल्ह्यांत वेगानं पसरतोय कोरोना, मृत्यू दरही धडकी भरवणारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 09:52 PM2020-08-08T21:52:25+5:302020-08-08T21:57:15+5:30

भारतातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता 20,88,611 एवढी झाली आहे. यापैकी 6,19,088 रुग्ण सक्रिय आहेत. तर 42,518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

CoronaVirus Marathi News Health secretary meeting with 13 district of 8 states regarding corona case fatality and new cases | Coronavirus : आठ राज्यांतील 'या' 13 जिल्ह्यांत वेगानं पसरतोय कोरोना, मृत्यू दरही धडकी भरवणारा

Coronavirus : आठ राज्यांतील 'या' 13 जिल्ह्यांत वेगानं पसरतोय कोरोना, मृत्यू दरही धडकी भरवणारा

Next
ठळक मुद्देया आठ राज्यांतील 13 जिल्ह्यांत केवळ संक्रमित रुग्णच नव्हे तर मृत्यू दरही अधिक आहे. या जिल्ह्यांत कोरोनमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 14 टक्के आहे. भारतातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता 20,88,611 एवढी झाली आहे.

नवी दिल्ली - देशात काही राज्यांतील आणि केंद्रशासित प्रदेशांतील जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आज आठ राज्यांचे आरोग्य सचीव, जिल्हाधिकारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि सर्व्हिलांस अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

या आठ राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांत आसाम, बिहार, झारखंड, केरळ, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे. या आठ राज्यांतील 13 जिल्ह्यांत केवळ संक्रमित रुग्णच नव्हे तर मृत्यू दरही अधिक आहे. 

हे आहेत 13 जिल्हे -
आसाममधील कामरूप मेट्रोपोलिटन, बिहारमधील पाटणा, झारखंडमधील रांची, केरळमधील अलप्पुझा आणि तिरुवनंतपुरम, ओडिशातील गंजम, उत्तर प्रदेशातील लखनौ,  पश्चिम बंगालमधील 24 परगना, उत्तर हुगळी, हावडा, कोलकाता आणि मालदा आणि दिल्ली, या ठिकानी आता कोरोना वेगाने पसरू लागला आहे. तसेच येथील मृत्यू दरही  अधिक आहे.

या जिल्ह्यांत भारतातील सक्रिय रुग्णांपैकी जवळपास 9 टक्के रुग्ण आहेत. तर कोरोनमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण तब्बल 14 टक्के आहे. चार जिल्हे असेही आहेत, जेथे सात्याने नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. यात आसाममधील कामरूप मेट्रोपोलिटन, उत्तर प्रदेशातील लखनौ, केरलमधील तिरुवनंतपुरम आणि अलप्पुझा, यांचा समावेश आहे.

भारतातील कोरोना संक्रमितांची एकूण संख्या आता 20,88,611 एवढी झाली आहे. यापैकी 6,19,088 रुग्ण सक्रिय आहेत. तर 42,518 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 14,27,005 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते बरे होऊन घरी गेले आहेत. भारतात कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा दर 68.32 टक्के एवढा आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus Vaccine : प्रतीक्षा संपली! 12 ऑगस्टला जगातील पहिल्या कोरोना लसीचं रशिया करणार रजिस्ट्रेशन

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

Naagin Revenge : नाग पंचमीच्या दिवशी मारला 'नाग', नागिनीचा आतापर्यंत 26 जणांना चावा!

झटक्यात चमकलं मजुराचं नशीब; पाण्याने धुतली माती, मिळाले लाखोंचे हिरे

Web Title: CoronaVirus Marathi News Health secretary meeting with 13 district of 8 states regarding corona case fatality and new cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.