CoronaVirus News: दिलासादायक!; "देशात कोरोना रिकव्हरी रेट 50%च्या जवळ, कम्युनिटी ट्रान्समिशन नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 08:23 PM2020-06-11T20:23:17+5:302020-06-11T20:25:07+5:30
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की आपण नेहमीच ज्या देशांची लोकसंख्या आपल्या एवढी आहे, त्याच देशांशी तुलना करायला हवी. ज्या देशांची लोकसंख्या आपल्या पेक्षा कमी आहे, त्यांच्याशी आपण तुलना करू शकत नाही.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असतानाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट 49.2 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले, की बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षाही अधिक झाली आहे. कोरोनाचा रिकव्हरी रेटही चांगला होत आहे. तर आयसीएमआरने म्हटले आहे, की भारतात अद्याप कम्यूनिटी ट्रान्समिशीन झालेले नाही.
पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की आपण नेहमीच ज्या देशांची लोकसंख्या आपल्या एवढी आहे, त्याच देशांशी तुलना करायला हवी. ज्या देशांची लोकसंख्या आपल्या पेक्षा कमी आहे, त्यांच्याशी आपण तुलना करू शकत नाही.
पतंजलीकडे कोरोनाचं औषध तयार; हजारो रुग्ण बरे झाल्याचा आचार्य बालकृष्ण यांचा दावा
आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव म्हणाले, प्रति लाखचा विचार केल्यास आपल्या देशात कोरोना रुग्ण कमी आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यू दरही फार कमी आहे. आम्ही 83 जिल्ह्यांत सर्व्हे केला. यात लॉकडाउन यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. लॉकडाउनमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवता आले. मात्र आताही सर्वांनी मास्कचा वापर करणे , हात धुने आणि सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. वृद्ध आणि लहान मुलांना कोरोनाचा धोका अधिक आहे.
भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, गावांच्या तुलनेत शहरांध्ये अधिक रुग्ण आढळून येत आहेत. हा सर्व्हे 24 हजार लोकांवर करण्यात आला. देशभरातील अनेक जिल्ह्यांत एप्रिलच्या अखेरीस असलेल्या स्थिती संदर्भात हा सर्व्हे करण्यात आला.
Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अॅडव्हान्स्ड' व्हॅक्सीन
कम्युनिटी ट्रान्समिशनच्या प्रश्नावर आयसीएमआरने म्हटले आहे, की भारतासारख्या मोठ्या देशात कोरोनाचा प्रसार फार कमी आहे. भारत कम्युनिटी ट्रान्समिशनच्या स्थितीत नाही. कम्युनिटी ट्रान्समिशन शब्दावर मोठी चर्चा सुरू आहे. यासंदर्भात जागतीक आरोग्य संघटनेनेही निश्चित स्वरुपाची व्याख्या केलेली नाही. सध्या भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, असेही आयसीएमआरने म्हटले आहे.