फिरोजाबाद - भारतातही कोरोना आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. जान है तो जहान है... असं म्हणत नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन मोदींनी जनतेला हात जोडून केले. नाही तर देशाला याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 500 रुपये जमा केले आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-धंदे बंद आहेत. काही भागात हातात काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामध्ये वृद्धांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. याच दरम्यान एका गरीब वृद्ध महिलेला सरकारी जनधन योजनेतून खात्यावर 500-500 रुपये मदत आल्याची माहिती मिळाली. पैशाची अत्यंत गरज असल्याने महिलेने बँकेत जाण्याचा निर्णय घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, राधा पत्नी हरवीर असं 72 वर्षीय महिलेचं नाव असून त्या फिरोजाबाद येथील हिंमतपूरच्या रहिवासी आहेत.
72 वर्षांच्या महिलेने बँकेत जाण्यासाठी रात्रभर 50 किलोमीटर पायी प्रवास केला. सकाळी त्या टुंडला येथील बँकेत गेल्या. त्यांनी पंतप्रधान जनधन योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात 500 रुपये जमा झाले आहेत का याबाबत विचारणा केली. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. बँकेतील कर्मचाऱ्याने दिलेली माहिती ऐकून त्यांना काय करावं हे सुचेना. तुमच्या खात्यावर पैसे आलेच नाहीत असं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे निराश झालेल्या राधा आपल्या घरी परत गेल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जनधन खात्यात सरकारने 500 रुपये टाकले आहेत. याची माहिती मिळताच काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशच्या भिंडमध्ये महिला मोठ्या संख्येनं बँकेत पोहोचल्या. यामुळे गर्दी झाली आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नाही. मध्यप्रदेशातील 39 महिलांना लॉकडाऊनवेळी जनधन योजनेतील 500 रुपये तर मिळाले नाहीतच पण त्यांना 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागला होता. लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचं उल्लंघन केल्या प्रकरणी 39 महिलांना तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. पोलिसांनी त्यांच्यावर 151 अंतर्गत कारवाईसुद्दा केली. त्यानंतर 10 हजार रुपयांचा दंड भरल्यावर त्यांची सुटका करण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : 1200 मजुरांना घेऊन वसई रोड ते गोरखपूर अशी पहिली विशेष ट्रेन रवाना!
भयंकर! BSF जवानाकडून आधी अधिकाऱ्याची हत्या, नंतर केली स्वत: आत्महत्या
बापरे! Reliance Jio च्या लाखो युजर्सचा डेटा ऑनलाईन लीक
CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet