नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. जगभरात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अकराव्या व नंतर नवव्या स्थानी असलेला भारत गुरुवारी सातव्या स्थानी होता; पण रुग्णवाढीमुळे भारत इटलीच्या पुढे म्हणजे सहाव्या स्थानी आला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर तामिळनाडूमध्ये 28 हजारांपेक्षा अधिक, तर दिल्लीमध्ये 26 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. गुजरातमध्ये 19 हजारांहून अधिक रुग्ण आहेत. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 9971 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 287 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 246628 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 6929 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. रविवारी (7 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 9971 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दोन लाख 40 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सहा हजारांवर पोहोचला आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 120406 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 119293 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील संशोधकांनी कोरोनावर एक खास किट विकसित केलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हैदराबादच्या संशोधकांनी असा कोरोना चाचणीसाठी एक किट विकसित केलं आहे. या किटच्या मदतीने अवघ्या 20 मिनिटांत रिझल्ट मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
आयआयटी हैदराबादने विकसित केलेले कोविड -19 टेस्टिंग किट सध्या वापरल्या जाणार्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअॅक्शनवर आधारित नाही. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे किट 550 रुपये किंमत लक्षात ठेवून विकसित केले गेले आहे. मात्र मोठ्या संख्येने उत्पादन केल्यास याची किंमत 350 रुपयांपर्यंत असू शकते. हैदराबादच्या ईएसआयसी मेडिकल कॉलेज व रुग्णालयात चाचणी किटच्या पेटंटसाठी संशोधकांनी अर्ज केला आहे आणि क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे परवानगी मागण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध; 'हे' आहे कारण
अम्फान आणि निसर्ग चक्रीवादळानंतर आता आणखी एका वादळाचा धोका; हवामान खात्याचा इशारा
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात WHO ने जारी केल्या मास्क संदर्भात नव्या गाईडलाईन्स
धक्कादायक! ...अन् तब्बल 22 वर्षांनंतर पोलिसांनी आरोपींना पकडलं; 'त्या' हत्येचं गूढ उकललं
CoronaVirus News : टक्कल असलेल्या पुरुषांना कोरोनाचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध