नवी दिल्ली : कोरोना आणि त्यापासून वाचण्यासाठी लॉकडाऊन यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. महिना उलटून गेल्याने खिशातील पैसे आणि घरातील अन्नधान्य संपत चालले आहे. यामुळे मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील २० कोटी घरांना याचा लाभ मिळणार आहे.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशभरातील २० कोटी घरांमध्ये केंद्र सरकारकडून डाळीचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी ५.८८ लाख टन डाळ तयार करणे आणि त्याची वाहतूक करण्याचे काम जोरात सुरु आहे. पीडीएसशी जोडलेल्या घरांना याचा फायदा मिळणार आहे. काही राज्ये एकाचवेळी तीन महिन्यांची डाळ वाटू शकणार आहेत.
उर्वरित राज्यांना मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत डाळ देण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वी निर्मला सीतारामन यांनी सार्वजनिक वितरण प्रणालीला जोडलेल्या कुटुंबांना १ किलो मोफत डाळ देण्याची घोषणा केली होती. आतापर्यत ३०००० टन डाळीचे वितरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात शेती आणि साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांना परवानगी दिल्याने शेतीची तयारी सुरु झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, राजस्थान, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये एमएसपी किंमतीवर धान्य खरेदीही सुरु झाली आहे. या खरेदीवर एकूण ७८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशभरात सव्वा लाख शेतकऱ्यांकडून त्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला आहे. याची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे.
आणखी वाचा...
...बस खिडकी थोडीशी उघडी ठेवा; कोरोनाला संपवण्यासाठी सरकारचे आवाहन
किम जोंग उनचा मृत्यू की ब्रेन डेड? उद्या मोठ्या घोषणेची शक्यता