नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव दिवसेंदिवस देशात गंभीर परिस्थिती निर्माण करत आहे. त्यातच गेल्या २४ तासांत देशातील कोरोनाच्या आकडेवारीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे तब्बल ८९ हजारांहून अधिक रुग्ण सापडले असून, दिवसभरात १११५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या तब्बल ८९ हजार ७०६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील एकू कोरोनाबाधितांचा आकडा ४३ लाख ७० हजार १२९ झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३३ लाख ९८ हजार ८४५ हजार हून अधिक झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल १ हजार ५३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ७३ हजार ८९० एवढी झाली आहे.
महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनाचे २० हजार रुग्णमहाराष्ट्रात मंगळवारी कोरोनाचे २० हजार १३१ रुग्ण आढळले असून ३८० मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आलेख चढाच आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ४३ हजार ७७२ झाली असून मृतांचा आकडा २७,४०७ झाला.राज्यात सध्या २ लाख ४३ हजार ४४६ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.२६ असून मृत्युदर २.९ टक्के आहे. दिवसभरात १३,२३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण ६ लाख ७२ हजार ५५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.दिल्लीमध्ये पुन्हा परिस्थिती बिघडलीकाही दिवसांपूर्वीपर्यंत कोरोना नियंत्रणात आलेल्या दिल्लीमध्ये पुन्हा एकदा बाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दिल्लीत काल ३ हजार ६०९ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या दोन लाखांच्या जवळ पोहोचली आहे. उत्तर प्रदेशमध्येही काल ६ हजार ७४३ रुग्णांची नोंद झाली आहे.दक्षिण भारतातही कोरोना मोकाटकोरोना विषाणूने देशातील इतर भागांप्रमाणेच दक्षिण भारतालाही घट्ट विळखा घातला आहे. दक्षिण भारतात आंध्र प्रदेशात सर्वाधिक बिकट परिस्थिती असून, राज्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्ण सापडत आहेत. तर मंगळवारी सापडलेल्या १० हजार ६०१ रुग्णांसह येथील रुग्णसंख्या पाच लाख १७ हजार झाली आहे. तामिळनाडूमध्ये पाच हजार, केरळमध्ये तीन हजार आणि तेलंगणामध्ये दोन हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.