CoronaVirus News : अहमदाबादेत आठवड्यात आढळले ७०० कोरोना रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 01:16 AM2020-05-18T01:16:11+5:302020-05-18T01:16:30+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनाची लागण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अहमदाबादमध्ये ७ मे ते १४ मे या कालावधीत दूध व औषधांची विक्री करणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता.

CoronaVirus News: 700 corona patients found in Ahmedabad in a week | CoronaVirus News : अहमदाबादेत आठवड्यात आढळले ७०० कोरोना रुग्ण

CoronaVirus News : अहमदाबादेत आठवड्यात आढळले ७०० कोरोना रुग्ण

Next

अहमदाबाद : येथे भाजी व औषधे अशा वस्तूंची विक्री करणाऱ्या सुमारे ७०० जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे एका आठवड्यात केलेल्या तपासणीत आढळून आले. गुजरातमधील रुग्णांची संख्या ११ हजारांजवळ पोहोचली असून, अहमदाबादेत रुग्णांची संख्या ८१४४ झाली आहे.
कोरोनाची लागण रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अहमदाबादमध्ये ७ मे ते १४ मे या कालावधीत दूध व औषधांची विक्री करणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. भाजीविक्रेते, किराणा सामान, दूधविक्री करणारे, पेट्रोल पंपावरील कर्मचारी, कचरासेवक कामगार आदी लोकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यामुळे झपाट्याने हा आजार आणखी पसरेल हे सरकारच्या लक्षात आले होते. त्यामुळे अहमदाबादमधील अशा लोकांपैकी सुमारे ३३,५०० लोकांचे आठवडाभरात स्क्रीनिंग करण्यात आले व त्यातील १२,५०० लोकांची कोरोनाविषयक चाचणी करण्यात आली. त्यातून सुमारे ७०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले.
एकाच आठवड्यात कोरोनाचे इतके रुग्ण शहरात आढळून आल्याने १५ मे रोजी अहमदाबादमधील दुकाने उघडण्यास काही अटींवरच परवानगी देण्यात आली. ज्यांचे स्क्रीनिंग झाले आहे, अशा भाजी, दूध, औषध, किराणा माल विक्रेत्यांनाच दुकाने उघडण्यास मंजुरी दिली आहे. या दुकानदारांना त्यांचे स्क्रीनिंग झाल्याचे कार्ड देण्यात आले आहे.
गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता यांच्याकडे अहमदाबादमधील कोरोनास्थितीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये आठवडाभरात इतक्या मोठ्या प्रमाणावर दुकानदार, फेरीवाल्यांचे स्क्र ीनिंग होण्याआधी, शहरात २० एप्रिलपासून केलेल्या चाचण्यांत या व्यावसायिकांमध्ये ३५० कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. यासंदर्भात राजीव गुप्ता यांनी सांगितले की, या दुकानदारांचा लोकांशी सतत संपर्क येत असतो. एखाद्या दुकानदाराला कोरोनाची लागण झाली असल्यास त्यामुळे अनेकांना त्याची बाधा होण्याची शक्यता असते. म्हणूनच त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या.
अहमदाबादमध्ये दूध, भाजीपाल्यासह अन्य जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत आहे. जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला, फळविक्रेत्यांना आपले दुकान दररोज सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेतच उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. अहमदाबाद येथे कोरोनाचा प्रादुर्भाव दहा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तिथेही काही तास दुकाने उघडी ठेवता येणार आहेत.

स्क्रीनिंग केलेल्यांकडूनच वस्तू विकत घ्या
कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी ज्यांचे स्क्रीनिंग झाले आहे , अशा दुकानदारांकडूनच जनतेने वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन गुजरातचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव गुप्ता यांनी केले आहे. स्क्र ीनिंग झालेले दुकानदार, फेरीवाल्यांनी त्यासंदर्भातील आपले कार्ड दर चौदा दिवसांनी नव्याने बनवून घेणे बंधनकारक आहे.

Web Title: CoronaVirus News: 700 corona patients found in Ahmedabad in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.