CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा धोका असलेल्या चिमुरड्यांच्या लसीचं काय?; तज्ज्ञ डॉक्टरांनी दूर केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 01:54 PM2021-06-04T13:54:56+5:302021-06-04T13:59:57+5:30

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचा तज्ज्ञांचा इशारा

CoronaVirus News aiims chief dr randeep guleria says pfizer coming in india for kids too | CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा धोका असलेल्या चिमुरड्यांच्या लसीचं काय?; तज्ज्ञ डॉक्टरांनी दूर केली चिंता

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा धोका असलेल्या चिमुरड्यांच्या लसीचं काय?; तज्ज्ञ डॉक्टरांनी दूर केली चिंता

Next

नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं खाली येत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. या लाटेचा सर्वाधिक धोका लहानग्यांना असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. भारतात अद्याप तरी लहानग्यांचं लसीकरण सुरू झालेलं नाही. सध्याच्या घडीला देशभरात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचं लसीकरण सुरू आहे. त्यामुळे लहानग्यांचं काय, त्यांना कोणती लस दिली जाणार असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.

देशात सध्या तरी लहानग्यांसाठी कोरोना लस उपलब्ध नाही. सध्याच्या घडीला जगात केवळ फायझरची लस लहान मुलांना दिली जात आहे. भारतातही लहान मुलांना फायझरचीच लस दिली जाईल अशी माहिती एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. लवकरच फायझरची लस भारतात येणार आहे. फायझर आणि मॉडर्नाच्या लसींना लवकरच मंजुरी दिली जाईल असे संकेत बुधवारी मोदी सरकारनं दिले. त्यामुळे लवकरच या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोठी बातमी! 'झायडस कॅडिला'च्या 'अँटिबॉडी कॉकटेल'ला वैद्यकीय चाचणीची परवानगी

देशात कोणत्याही चाचण्यांशिवाय लसींना परवानगी दिली जाईल, असं सरकारनं म्हटलं आहे, असं डॉ. गुलेरियांनी सीएनएन न्यूज १८ला सांगितलं. 'अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि जागतिक आरोग्य संघटनेनं मंजूर केलेल्या लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी देण्याची भूमिका याआधीही सरकारनं घेतली आहे. त्यामुळेच लवकरच फायझरची लस देशात उपलब्ध होईल. लहान मुलं आणि मोठ्यांनादेखील ती दिली जाईल,' असं गुलेरिया पुढे म्हणाले.

फायझर आणि मॉडर्नाच्यी लसी भारतात येण्यास उशीर का होत आहे याचं उत्तरंही गुलेरियांनी दिलं. 'प्राथमिक डेटा नसल्यानं लसी भारतात येण्यास विलंब झाला. कोणती लस किती सुरक्षित आहे याची माहिती त्याबद्दलचा तपशील अभ्यासल्यावरच समजते. युरोपमध्ये लसीचे साईड इफेक्ट्स दिसून आले. त्यानंतर अमेरिका आणि ब्रिटनचा डेटा उपलब्ध झाला. मग भारत सरकारनं हिरवा कंदिल दाखवला,' अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: CoronaVirus News aiims chief dr randeep guleria says pfizer coming in india for kids too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.