शिवपुरी: देशातील कोरोना रुग्णांच्या आकडा महिनाभरापासून झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाही आहेत. तर बऱ्यात राज्यांमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. कोरोना संकटात माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय देणाऱ्या घटना समोर येत आहेत. तर कुठे याच्या अगदी उलट प्रकार पाहायला मिळत आहेत. मध्य प्रदेशातल्या शिवपुरी जिल्हा रुग्णालयात अशीच घटना घडली आहे. कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार?, परिस्थिती नियंत्रणात कधी येणार? जाणून घ्याशिवपुरी जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनअभावी एका कोरोना रुग्णांचा अक्षरश: तडफडून मृत्यू झाला. रुग्णाची अवस्था गंभीर असल्यानं उपचारादरम्यान त्याचं निधन झाल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मात्र सीसीटीव्ही फुटेजमधून वेगळंच चित्र समोर आलं. रुग्णालयात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव सुरेंद्र होतं. ते रात्री ११ वाजता त्यांचा मुलगा दीपकसोबत बोलताना दिसत आहेत.पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये देता येऊ शकते वेगवेगळी कोरोनाची लस? तज्ज्ञ सांगतात की....यानंतर थोड्या वेळानं दीपक निघून जातो आणि सुरेंद्र झोपी जातात. यानंतर तिथे एक वॉर्ड बॉय येतो. तो सुरेंद्र यांच्या बेडजवळ असलेला पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर काढून नेतो. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास सुरेंद्र तडफडू लागले आणि ऑक्सिजनअभावी त्यांचा मृत्यू झाला. माझ्या वडिलांना ऑक्सिजन न देण्यात आल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलानं केला. 'आधी माझ्या वडिलांना स्ट्रेचरदेखील मिळाला नव्हता. मी त्यांना पाठीवरून आयसीयूमध्ये घेऊन गेलो होतो,' अशी व्यथा दीपक यांनी मांडली.
CoronaVirus News: वॉर्ड बॉयनं ऑक्सिजन सपोर्ट काढला; कोरोना रुग्णाचा तडफडून मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 9:17 AM