नवी दिल्ली - कोरोनामुळे अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात बेडची कमतरता, ऑक्सिजनचा मोठा तुडवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थिती नातेवाईकांनीही कोरोना रुग्णांची साथ सोडली आहे. आपलेही परके झाले आहेत. मात्र दुसरीकडे देशात असे ही काही लोक आहेत. ज्यांनी कोरोनाग्रस्तांसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना मदतीचा हात दिला आहे. डॉक्टर आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अहोरात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. आपल्या देश कोरोनाच्या या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना काही कौतुकास्पद घटना समोर येत आहेत.
खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट सुरू असून अवाजवी पैसे घेतले जात आहेत. मात्र असं असताना दुसरीकडे एक डॉक्टर दाम्पत्य अवघ्या दहा रुपयांत कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत. मिळालेल्य़ा माहितीनुसार, तेलंगणातील पेद्दापल्ली गावातील डॉक्टर दाम्पत्याने कोरोनाच्या संकटात सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. डॉ. राजू आणि त्यांची पत्नी पावनी हे दोघेही आपल्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर अगदी कमीत कमी दरात उपचार करतात. तर गरीबांना ते मोफत उपचार देतात. डॉक्टरांची सामान्य फी 300 रुपये होती. पण सध्या परिस्थिती लक्षात घेता ते रुग्णांवर उपचार केल्यानंतर फक्त 10 रुपये फी घेतात.
डॉक्टर दाम्पत्य गरजू लोकांसाठी देवदूत ठरलं आहे. कमी पैशांत उपचार करत असल्याने सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशात कोरोनाचा वेग सध्या थोडा मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,85,74,350 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2713 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,40,702 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात अनेक जण इतरांच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.
बापरे! कोरोनाने चिमुकल्याचं 90% फुफ्फुस झालं खराब पण तरीही टेस्ट निगेटिव्ह; डॉक्टरही हैराण
कोरोनामुळे एका मुलाचं फुफ्फुस हे 90 टक्के खराब झालं आहे. मात्र त्याचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्याची हैराण करणारी बाब समोर आली आहे. या घटनेमुळे डॉक्टरांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे आहे. तसेच त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बिहारमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. पाटणाच्या IGIMS मध्ये एका 8 वर्षांच्या मुलावर उपचार सुरू आहेत. त्याचं 90% फुफ्फुस खराब झालं आहे. किडनी आणि लिव्हरही संक्रमित झालं आहे. पण त्याची कोरोना टेस्ट मात्र निगेटिव्ह आली आहे. त्याची आरटी-पीसीआर टेस्ट केली, अँटिजेन टेस्ट केली. पण दोन्ही टेस्टमध्ये कोरोनाचं निदान झालं नाही. दोन्ही टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सिटी स्कॅनमध्ये त्याच्या कोरोनाचं निदान झालं, सिटी स्कॅन रिपोर्ट पाहून तर डॉक्टरांना धक्काच बसला.