CoronaVirus News: भारत बायोटेक, झायडसच्या प्रयोगांकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:20 PM2020-07-20T22:20:04+5:302020-07-21T06:38:06+5:30
भारत बायोटेककडून ‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या प्रयोगांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गावर प्रतिबंधक लस शोधून काढण्यासाठी सात भारतीय कंपन्यांकडून प्रयोग सुरू आहेत. त्यातील भारत बायोटेक तसेच झायडस कंपनीकडून सुरू असलेल्या प्रयोगांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
देशात इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, पॅनाशिया बायोटेक, म्यानव्हॅक्स, बायोलॉजिकल ई या भारतीय कंपन्याही लसीसाठी प्रयत्नशील आहेत. भारत बायोटेककडून ‘कोव्हॅक्सिन’च्या मानवी चाचण्यांच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याच्या प्रयोगांना केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. अॅस्ट्राझेनेसाच्या लसीच्या मानवी चाचण्या ऑगस्टपासून सुरू होतील.
झायडस कॅडिला ही भारतीय कंपनी बनवत असलेल्या झायकोव्ह-डी या लसीच्या मानवी चाचण्या सात महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. पॅनाशिया बायोटेक ही अमेरिकन कंपनी रेफानाच्या सहकार्याने लस शोधण्यासाठी प्रयोग करत आहे. पॅनाशिया बायोटेक कंपनी अमेरिकेच्या रेफाना कंपनीच्या सहकार्याने लस शोधण्यासाठी प्रयोग करत आहे.