भारतासारख्या खंडप्राय देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून १०० कोटी लोकांना लस देण्याचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य अवघ्या दहा महिन्यांत साध्य होत आहे. हा एक जागतिक विक्रमच म्हणायला हवा. लसीकरणाचा हा वेग कायम राहिल्यास दिवाळीत मास्कपासून मुक्ती मिळू शकते का, याबाबत सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. पाहूया काय आहे अंदाज...लसीकरणाचा आतापर्यंतचा प्रवास१६ जानेवारी रोजी देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.सुरुवातीच्या १३१ दिवसांत २० कोटी डोस दिले गेले.त्यानंतर पुढील २० कोटी डोस ५२ दिवसांत पूर्ण झाले.६० ते ८० कोटींचा टप्पा पूर्ण करण्यासाठी २४ दिवस लागलेआता ८० ते १०० कोटीचा टप्पा ३१ दिवसांत पूर्ण होणार आहे.लसीकरणाची आकडेवारी (वयोगटनुसार)५५ कोटी- १८ ते ४५ २७कोटी- ४५ ते ६०१७कोटी- ६०+इतर देशांची स्थितीअमेरिका ५६ ९%ब्रिटन ६७ ६%स्वीडन ६७ ४%हंगेरी ५९ २%चीन ७१ ५%इटली ७० ७%सौदी अरेबिया ५८ ८%न्यूझीलंड ५७ १६%मास्कमुक्तीचे काय?अनेक लोक अजूनही मास्क वापरताना दिसत नाहीत. तर बहुतेक लोकांचा मास्क हनुवटीवर असतो. लसीकरणानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे आवश्यकच आहे. मास्कमुक्तीचा विचार सध्या सरकार करणे शक्य दिसत नाही. आपणही मास्क कायम वापरल्यास, कोरोनापासून बचाव होईलयांची वाटचाल मास्कमुक्तीकडेब्रिटन, अमेरिका, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली
CoronaVirus News: मास्कमुक्त दिवाळी शक्य? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 8:19 AM