नवी दिल्ली : देशामध्ये शनिवारी व रविवारी मिळून कोरोनाचे १ लाख २८ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या २५ लाख ८९ हजारांहून अधिक झाली असून बळी गेलेल्यांची संख्या ५० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तर या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांची संख्या १८ लाख ६२ हजारांपेक्षा जास्त झाली आहे.कोरोनाचे शनिवारी ६५ हजार २ व रविवारी ६३ हजार ४९० नवे रुग्ण आढळले. दोन दिवसांचा हा एकत्रित आकडा १ लाख २८ हजार ४९२ इतका होतो. शनिवारी ९९६ व रविवारी ९४४ जणांचा बळी गेला. बळी गेलेल्यांपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे एकापेक्षा अधिक व्याधींनी ग्रस्त होते. ७ आॅगस्टपासून देशात रोज साठ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत आहेत.>७१.९१ रुग्ण पूर्ण बरेकेंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसगार्तून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण आता ७१.९१ टक्के झाले आहे. ही एकच बाब खूप आशादायतक आहे. आता कोरोना रुग्णांची एकूण संख्या २५,८९,६८२ इतकी असून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या १८,६२,२५८ इतकी झाली आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.९३ टक्के राखण्यात सरकारला यश आले आहे.>राज्यात कोरोनाचे ११,१११ नवे रुग्ण राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर पोहोचले आहे. दिवसभरात ११ हजार १११ नवे रुग्ण आढळले तर २८८ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 7,46,608कोरोना चाचण्या झाल्या. त्यामुळे देशातील कोरोना चाचण्यांची एकूण संख्या आता २,९३,०९,७०३ झाली आहे.
CoronaVirus News : दोन दिवसांत १.२८ लाखांहून अधिक नवे रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 5:04 AM