CoronaVirus News : ‘इटोलिझुमाब’च्या वापरास परवानगी; निष्कर्ष समाधानकारक, एम्समधील तज्ज्ञांचा निर्वाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 01:17 AM2020-07-12T01:17:24+5:302020-07-12T07:03:53+5:30
देशातील कोरोनाच्या रुग्णांवर इटोलिझुमाब या औषधाच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष तज्ज्ञांच्या समितीला समाधानकारक वाटले. या समितीत एम्स रुग्णालयातील फुप्फुसविकार तज्ज्ञ, औषधतज्ज्ञांचा समावेश आहे.
नवी दिल्ली : सोरायसिस या त्वचा रोगावर देण्यात येणारे इटोलिझुमाब या औषधाचा कोरोनाची कमी ते तीव्र लक्षणे दिसत असणाऱ्या रुग्णांवरील तातडीच्या उपचारांत मर्यादित वापर करण्यास केंद्रीय औषध नियंत्रक डॉ. व्ही. जी. सोमाणी यांनी परवानगी दिली आहे.
एखादा आजार जडल्यास
त्याला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिकारशक्तीचा वापर करण्याकरिता एका पेशीकडून दुसºया पेशीला संदेश देण्याचे काम सायटोकिन या पेशी करतात. त्या पेशी जर नेहमीपेक्षा अधिक वेगाने सक्रिय झाल्या तरी त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. सायटोकिन पेशींच्या कार्यातील बिघाडाची ही लक्षणे जर कोरोना रुग्णांमध्ये आढळून आली तर तातडीचा उपचार म्हणून इटोलिझुमावचे इंजेक्शन देण्यास केंद्रीय औषध नियंत्रकांनी परवानगी दिली आहे.
देशातील कोरोनाच्या रुग्णांवर इटोलिझुमाब या औषधाच्या घेण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष तज्ज्ञांच्या समितीला समाधानकारक वाटले. या समितीत एम्स रुग्णालयातील फुप्फुसविकार तज्ज्ञ, औषधतज्ज्ञांचा समावेश आहे. बायोकॉन या कंपनीकडून बनविण्यात येणारे इटोलिझुमाब हे औषध गेल्या अनेक वर्षांपासून सोरायसिसच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी
वापरले जाते.
कोरोना संसर्गावरील उपचारांत रेमडेसिव्हिरपासून आणखी काही औषधांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रभावी ठरेल असे म्हटले जात होते. पण प्रत्यक्ष चाचण्यांतून तसे आढळून आले नाही. भारतात कोरोना
रुग्णांच्या उपचारांत रेमडेसिव्हिरपेक्षा डेक्सामिथेसॉन हे औषध अधिक प्रभावी ठरेल, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.
रुग्णाची लेखी परवानगी आवश्यक
इटोलिझुमाब या औषधाच्या चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. या लसीचा उपचारांमध्ये वापर करण्यासाठी संबंधित कोरोना रुग्णाची लेखी परवानगी घेणे केंद्रीय औषध नियंत्रकांनी बंधनकारक केले आहे. त्यामुळे उपचार करणारे डॉक्टरही निश्चिंत राहतील.