अमेरिकेच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. भारत एक महान देश आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे चांगले मित्र आहेत. भारताला सोबत घेऊन आम्ही काम करतोय. भारतात कोरोनावर लस तयार करण्याचं मोठं काम सुरु असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसेच कोरोनाविरोधाच्या लढाईत अमेरिका भारताला व्हेंटिलेटर देईल, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. यावर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही सर्वजण कोरोना या साथीच्या विरोधात एकत्रितपणे लढा देत आहोत. अशा वेळी, राष्ट्रांनी एकत्र काम करण्यासाठी जितके शक्य असेल तितके सहकार्य करणे आणि जगाला कोरोनापासून मुक्त करणे आवश्यक आहे, असं नरेंद्र मोदी यांनी सांगतिले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाविरोधाच्या लढाईत अमेरिका भारतासोबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहे, असं सांगितले. तसेच अमेरिका भारताला व्हेंटिलेटर दान करेल. याशिवाय भारत आणि अमेरिका एकत्र मिळून कोरोनावर लस विकसित करु. अदृश्य कोरोना विषाणूला नष्ट करु, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन सांगतिले होते.