नवी दिल्ली : देशामध्ये मे महिन्यापासूनची आकडेवारी पाहिली तर आता प्रथमच कोरोना रुग्णांच्या टक्के वारीत घट आढळली आहे. कोरोनाचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी ९ आॅगस्ट रोजी ९.०१ टक्के होती. ती आता ८.७२ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत होती. मात्र, आता अशा रुग्णांची टक्के वारी कमी होताना दिसत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी दिसत असली तरी या संसर्गाच्या फैलावाची गती हळूहळू कमी होत चालली आहे.देशामध्ये रोज होणाºया कोरोना चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रुग्ण लवकर शोधून त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात येत आहेत. त्यामुळेही फैलावाचा वेग काहीसा कमी झाला आहे. देशातील अनेक राज्यांनी दररोज विशिष्ट संख्येने कोरोना चाचण्या करायच्या हे लक्ष्य ठरवून घेतले आहे. त्यानुसार त्यांची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेही कोरोना रुग्णांची टक्केवारी आता कमी होत आहे. देशामध्ये असे असंख्य लोक आहेत की, त्यांना कोरोनाची लागण झाली; परंतु त्याची कोणतीही लक्षणे त्यांना जाणवली नव्हती. अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्तीही उत्तम होती. त्यामुळे कोणतेही उपचार करावे न लागता या व्यक्ती बºया झाल्या. अशा अनेक व्यक्तींचा शोध सिरॉलॉजिकल सर्वेक्षणात लागला. बºया झालेल्या व्यक्तींची संख्या वाढल्याने व काही ठिकाणी तेथील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत बºया झालेल्या व्यक्तींचे प्रमाण ५० टक्क्यांहून जास्त झाले आहे.आधीच बºया झालेल्या व्यक्तींची कदाचित पुन्हा चाचणी झाल्याने व त्यात त्यांना कोरोनाची बाधा न आढळल्याने त्या व्यक्तींचा समावेशही कोरोनापासून उपचारानंतर बरे झालेल्या व्यक्तींच्या संख्येत झाला असण्याची शक्यता आहे.
CoronaVirus News: रुग्णांचे प्रमाण आता ८.७२ टक्के; चाचण्या वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:43 AM