दुर्दैवी! लग्नाची खरेदी करताना दोघींना कोरोना संसर्ग; आईच्या अंत्यसंस्कारावेळीच इंजीनियर मुलीनं सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:11 PM2021-05-13T16:11:55+5:302021-05-13T16:27:29+5:30
CoronaVirus News : संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होतं. माहामारीमुळे त्यांनी लग्न नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता.
(Image Credit- Bhaskar.com)
संपूर्ण भारतभरात कोरोनाच्या लाटेनं कहर केला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढच्या उद्रेकामुळे सर्वच कुटुंबियातील लोकांना गंभीर संकटांचा सामना करावा लागत आहे. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातून अशीच एक हृदयद्रावक घटना समोर येत आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे १२ तासात आई आणि मुलीला आपले प्राण गमवावे लागले आहेत. आईला अग्नी देत असताना दुसरीकडे मुलीनंही आपले प्राण गमावले. विशेष म्हणजे मृत तरूणी ही B.Tech. डिग्री होल्डर होती. संपूर्ण कुटुंब तिच्या लग्नाची तयारी करत होतं. माहामारीमुळे त्यांनी लग्न नोव्हेंबरला करण्याचा निर्णय घेतला होता.
माजी सरपंचाच्या घरात २ वर्षात जवळपास ४ जणांचा मृत्यू
माजी सरपंच कन्हैया लाल यांच्या पत्नीचे हृदयविकाराच्या आजारामुळे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्याच वेळी मुलगा बद्रीलाल (47) यांचे एका वर्षापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सून बद्रीबाई (वय 45), 3 नातवंडे कुटुंबात जिवंत राहिले. काही महिन्यांपासून कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. कारण अलिकडेच नात संगिता (वय २५) वर्ष हिचं लग्न ठरलं होतं.
संगीता जयपूर येथून बी. टेक सिव्हिल इंजिनिअरिंग शिकली होती. साथीच्या आजारामुळे तीचे लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले. संगीताची आई बद्रीबाई लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. माजी सरपंचांनी नातीच्या लग्नासाठी हॉल, हलवाई आणि बरीच काही व्यवस्था केली होती. 21 नोव्हेंबरला कोटा येथे तिचे लग्न करायचे होते. ऑक्सिजन मास्क लावून ९५ वर्षांच्या आजींचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ
संगीताची आई बद्रीबाई एका महिन्यापूर्वी लग्नाच्या खरेदीसाठी गेल्या होत्या. तिथून परत आल्यावर त्या आजारी पडल्या. त्यांना कोटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुलगी संगीताही रुग्णालयात होती. यावेळी मुलीची तब्येतही खालावली. जवळपास १२ दिवस या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काळानं घात केला आणि या दोन्ही मायलेकींनी प्राण सोडला. कोरोनामुळे एका व्यक्तीचा २ वेळा मृत्यू; तिरडीवर ठेवताच श्वास घेऊ लागला, मग त्याच एम्ब्यूलेंसनं रुग्णालय गाठलं