नवी दिल्ली : देशभर लागू करण्यात आलेला तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन रविवारी संपुष्टात येत आहे. उद्यापासून (दि. १८ मे) देशात पुढचा लॉकडाऊन लागू करण्याआधी आरोग्य मंत्रालयाने सर्व वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यावर चर्चा केली. यात देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण चिंताजनक असलेल्या ३० जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात कसलीही सवलत न देता कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.निवडलेले हे जिल्हे व महापालिका महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगण, पश्चिम बंगाल, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाब आदी राज्यांत आहेत. या ठिकाणी रुग्ण दुपटीचा दर, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आणि उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा झाली. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९० हजारांच्या पुढे गेली आहे. दररोज सुमारे ३००० नवे बाधित आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर यापुढे लॉकडाउन पाळताना काही परिसरात विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.ही आहेत ती शहरेमहाराष्ट्र : मुंबई, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, पालघर, पुणे, सोलापूरगुजरात : वडोदरा, अहमदाबाद, सुरतमध्य प्रदेश : भोपाळ, इंदूरआंध्र प्रदेश : कुरनूलराजस्थान : जयपूर, जोधपूर, उदयपूरदिल्ली : बहुतांश रेजझोनओडिशा : बरहमपूरतमिळनाडू : विल्लुपुरम, चेंगलपट्टु, कुड्डालोर, आरियालुर, ग्रेटर चेन्नई, तिरुवल्लूरपश्चिम बंगाल : हावडा, कोलकातातेलंगण : ग्रेटर हैदराबादपंजाब : अमृतसरउत्तर प्रदेश : आग्रा, मेरठ४६ हजार कोरोनाबाधित देशातील केवळ ५ शहरांतदेशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस आणखी गंभीर बनत चालली आहे. काही दिवसांपूर्वी ४० हजारांच्या आसपास असणारा बाधितांचा आकडा आज ९० हजारांच्याही पुढे गेला आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई या पाच शहरांची स्थिती खूपच चिंताजनक आहे. या पाच शहरांतील बाधितांचा आकडा ४६ हजारांच्या आसपास आहे.विशेषत: केंद्राने लॉकडाऊनमध्ये काहीबाबतीत शिथिलता दिल्यानंतर हा आकडा वाढत चालला आहे. त्यात स्थलांतरित मजूर मोठ्या प्रमाणावर मूळ गावी परतू लागल्याने बाधितांमध्ये भर पडत आहे. देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आज ५० दिवस पूर्ण झाले.गुजरातमध्ये शनिवारी आढळलेल्या १०५७ बाधितांपैकी ९७३ एकट्या अहमदाबादमधील आहेत. या शहरात ८१४४ जणांना ही बाधा झाली आहे, तर ४९३ जणांचा यात बळी गेला आहे. गुजरातमधील रुग्णांचा एकूण आकडा १० हजार ९८९ वर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीचा आकडा ९,३३३ वर गेला आहे. दिल्लीचा बहुतांश भाग रेड झोनमध्ये आहे. शनिवारी दिल्लीत नवे ४३८ रुग्ण आढळले. आतापर्यंत दिल्लीत १२९ जणांचा कोरोनांमुळे बळी गेला आहे.तमिळनाडूमध्ये ४७७ नवे रुग्ण आढळले असून एकूण आकडा १० हजार ५८५ वर पोहोचला आहे.महाराष्ट्रातील आकडाही झपाट्याने वाढत असून तो 30 हजार 706 हून अधिक झाला आहे. दिवसभरात नव्या 1606 रूग्णांचे निदान झाले. तर राज्यात 7 हजार 88 जण यातून पूर्ण बरे झाले आहेत.
CoronaVirus News : ३० जिल्हे, महापालिका क्षेत्रांत कडक निर्बंध राहणार; वाढत्या संसर्गामुळे कसलीही सूट नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 12:45 AM