CoronaVirus News : खळबळजनक! कुटुंबीयांनी दफन केला पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला मृतदेह अन् 18 दिवसांनी घरी परतली महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 12:42 PM2021-06-04T12:42:20+5:302021-06-04T12:49:08+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,85,74,350 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,364 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2713 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,40,702 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक भयंकर घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला. मात्र त्यानंतर काही दिवसांनी ती महिला परत आल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या विजयवाडा येथील रुग्णालयात एका 70 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 15 मे रोजी तिच्या पतीने पॉलिथीनमध्ये असलेला पत्नीचा मृतदेह दफन केला. त्यानंतर 1 जून रोजी कुटुंबाने शोकसभा आयोजित केली होती. पण दुसऱ्याच दिवशी ही महिला घरी परतल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला. आंध्र प्रदेशच्या कृष्णा जिल्ह्यातील ख्रिश्चनपेठ गावात ही घटना घडली आहे. गिरिजाम्मा असं या महिलेचं नाव असून यांना कोरोनाची लागण झाली होती. 12 मे रोजी विजयावाडाच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
चिंताजनक! डॉक्टरांनी रुग्णांच्या चाचण्या केला असता रिपोर्ट पाहून बसला मोठा धक्का#blackfungus#whitefungus#YellowFungus#Mucormycosis#Indiahttps://t.co/jwbW7YMU0c
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021
महिलेचे पती नियमितपणे पत्नीला पाहण्यासाठी रुग्णालयात जात होते. 15 मे रोजी त्यांना त्यांची पत्नी कोविड वॉर्डमध्ये नसल्याचे लक्षात आलं. त्यांनी इतर वॉर्डमध्येही तपास केला मात्र गिरिजाम्मा यांचा पत्ता लागला नाही. त्यावेळी तिथल्या नर्सनी गिरिजाम्मा यांचा मृत्यू झाला असावा असे त्यांना सांगितले. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना शवगृहातून पॉलिथीनमध्ये गुंडाळलेला एक मृतदेह दिला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळल्यानंतर त्यांच्या पतीने तो मृतदेह गावी आणला. कोरोनाच्या भीतीने रुग्णालयातून पॉलिथीनमध्ये गुंडाळून दिलेला मृतदेह कुटुंबीयांनी उघडून पाहिला नाही आणि तो दफन केला.
CoronaVirus Live Updates : धक्कादायक! आई-वडिलांच्या मृत्यूमुळे दीड महिन्यांचं बाळ आणि तीन वर्षांचा चिमुकला झाला पोरका; मन हेलावणारी घटना#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindiahttps://t.co/Pw4AO53Fv7
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021
1 जून रोजी कुटुंबाने एका शोकसभेचे आयोजन केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गिरिजम्मा घरी परतल्या. त्यांना पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्यानंतर दुसऱ्याच कोणत्या तरी मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. या सर्व प्रकरणाची माहिती नसलेल्या गिरिजम्मा कोरोनातून बरे झाल्यानंतरही कोणी आपल्याला घ्यायला आलं नाही यामुळे दु:खी होत्या. रुग्णालयाने त्यांना घरी जाण्यासाठी 3000 रुपये दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
CoronaVirus News : "कोरोनाचे संकट हे भाजपा सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं संकट"; खासदाराचं वादग्रस्त विधानhttps://t.co/F8WrIFRUS4#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#ShafiqurRahmanBarqpic.twitter.com/pNxqnAuVt5
— Lokmat (@MiLOKMAT) June 4, 2021