नागरी उड्डयन आणि गृहनिर्माण (स्वतंत्र प्रभार) आणि वाणिज्य राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांची ‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी नवी दिल्लीत घेतलेली मुलाखत.चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांची खूप चर्चा आहे. काही प्रगती?आम्ही विविध मंत्रालयांसोबत १,००० संभाव्य गुंतवणूकदारांची यादी शेअर केली आहे. जेणेकरून, गुंतवणुकीला गती येईल. फॉक्सकॉन अँड विस्ट्रॉन (अॅपलसाठी काम करणारी कंपनी), कार्बन, लावा यांनी प्रोत्साहन योजनेसाठी अर्ज केला आहे. यासाठी आम्ही एका संस्थात्मक आराखड्याच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. जपान सरकार चीनमधील त्यांच्या कंपन्यांना स्थलांतरित करण्यासाठी निधी देणार आहे.२०२०- २१ या काळात किती कंपन्या येतील?ही तर एक सुरुवात आहे. मात्र, कोरोनाच्या काळात जागतिक स्तरावर आदान-प्रदानाची साखळी खंडित झाली आहे. जपान, कोरिया आणि अमेरिकेच्या कंपन्यांकडून आम्हाला अपेक्षा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्यावर एवढा विश्वास दाखविण्याचे रहस्य काय?पंतप्रधान मोदी यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि माझ्याकडे दिलेल्या जबाबदाºया याबद्दल मी त्यांचा खूप कृतज्ञ आहे. ते जे काम देतील ते मी उत्तमरीत्या करीन.तुम्ही पहिल्यांदाच खासदार झाला असून, माजी मुत्सद्दी आहात.भारतीय परराष्ट्र सेवेत आणि मुत्सद्दी म्हणून मी ४० वर्षे काम केले. केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश व्हायच्या आधी मी ‘थिंक टँक’चा अध्यक्ष होतो.उड्डयन मंत्रालय सर्व मंत्रालयांत कठीण आहे?ते फारच कठीण आहे, असे मी म्हणणार नाही; परंतु फक्त भारतातच अर्थव्यवस्थेच्या आव्हानात्मक क्षेत्रांपैकी एक आणि महत्त्वाचे हे क्षेत्र आहे, असे नाही तर जगातही महत्त्व आहे.आज तुम्ही सगळ्यात मोठ्या कोणत्या आव्हानाला तोंड देत आहात?उड्डयन उद्योगाला कोविड-१९ चा फार मोठा फटका बसला. जगात अनेक विमान कंपन्या दिवाळखोरीत गेल्या. लॉकडाऊननंतर लगेचच लाईफ लाईन उडान मोहिमेत एअर इंडियाने विदेशातून १९०० टन वैद्यकीय साहित्य आणले आणि मित्रदेशांना ३० टन पाठवले. वंदे भारत उड्डाणांद्वारे साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांना हलविण्यात आले. आमच्यासमोर आव्हान आहे ते आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे.आंतरराष्ट्रीय उड्डाणे नियमित कधी सुरू होणार?आमची देशातील हवाई वाहतूक तिच्या क्षमतेच्या ५०-६० टक्क्यांपर्यंत पोहोचली की आणि इतर देश कोणत्याही अटी किंवा बंधनाशिवाय आंतरराष्ट्रीय वाहतूक कशी खुली करतात, त्यानुसार नियमितपणे आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतील. परंतु राज्यांना तर देशांतर्गत उड्डाणेही वाढविण्याची भीती आहे.२६ जूनपासून ४५ टक्के क्षमतेपर्यंत ते गेले आहे. पहिल्या दिवशी ३० हजार प्रवाशांसह सुरुवात केली आणि ६५ हजारांना स्पर्श केला. उड्डाणांची संख्या दिवसाला ४३० वरून ७५० झाली.अनेक राज्यांनी स्पष्टपणे नकार दिला असताना तुम्ही हे यश कसे मिळवले?आम्ही त्यांच्याशी बोललो. ते त्यांच्या काही तोडग्यासह (क्वारंटाईन ते चाचण्या इत्यादी) आले होते.महाराष्ट्राने उड्डाणांना नकार दिला होता?(हसले). उद्धव ठाकरेजी हे माझे प्रिय मित्र आहेत. महाराष्ट्र सरकारने मुंबईसाठी फक्त २५ उड्डाणांना परवानगी दिली. रोजची ५० विमाने येणार व जाणार.एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया रुळावर आहे काय?कोरोना साथीमुळे विलंब होत आहे; पण प्रक्रिया रुळावरून उतरलेली नाही.बस सुरू झाल्या आहेत. मात्र, दिल्ली व इतरत्र मेट्रो नाही?मेट्रो सेवा सुरू करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाकडून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार घेतला जाईल.ई-कॉमर्स कंपन्यांनी उत्पादनांवर मूळ देशाचे नाव द्यावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत?यात चूक काय आहे? आम्ही ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबत सांगितले आहे की, उत्पादनांवर मूळ देशाचे नाव असावे. भारत योग्य मार्गावरून जात आहे.
coronavirus: चीनमधील एक हजार गुंतवणूकदारांचे भारताकडे लक्ष -हरदीपसिंग पुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 5:24 AM