CoronaVirus News: ...तरच भारत स्वावलंबी होईल; पंतप्रधान मोदींनी सांगितली पंचसुत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 08:58 PM2020-05-12T20:58:49+5:302020-05-12T21:47:33+5:30
CoronaVirus news: कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून २० लाख कोटींचं आर्थिक पॅकेज जाहीर
नवी दिल्ली: कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात येईल. मात्र या पॅकेजमध्ये देशातल्या प्रत्येक घटकासाठी काही ना काही असेल, असं मोदी म्हणाले. सध्या जग अनुभवत असलेलं संकट अभूतपूर्व आहे. मात्र भारत याच संकटाचा वापर संधी म्हणून करेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.
स्वावलंबी भारत घडवण्याची पंचसुत्री पंतप्रधान मोदींनी सांगितली. स्वावलंबी भारताचे पाच प्रमुख स्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. 'स्वावलंबी भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, पायाभूत सोयीसुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र, मागणी यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. स्वावलंबी भारताचं स्वप्न साकारण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. पायाभूत सोयीसुविधांना बकळटी द्यावी लागेल. स्वावलंबी भारतासाठी यंत्रणेत बदल करावे लागतील. ती अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही असायला हवी. लोकसंख्याशास्त्र आपलं सामर्थ्य आहे. तिचा पुरेपूर वापर करायला हवा. भारतीय बाजारातील मागणी हीदेखील आपली जमेची बाजू आहे. मागणी आणि पुरवठा साखळीतले सगळे घटक सशक्त करायला हवेत. त्यांचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्याची गरज आहे,' असं मोदी म्हणाले.
I announce a special economic package today. This will play an important role in the 'Atmanirbhar Bharat Abhiyan'. The announcements made by the govt over COVID, decisions of RBI & today's package totals to Rs 20 Lakh Crores. This is 10% of India's GDP: PM Narendra Modi #COVID19pic.twitter.com/VGpGlIapOy
— ANI (@ANI) May 12, 2020
कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकारनं आतापर्यंत केलेल्या आर्थिक घोषणा, रिझर्व्ह बँकेनं घेतलेले निर्णय आणि आता सरकारनं घोषित केलेलं स्वावलंबी भारत पॅकेज यांची बेरीज करता ते २० लाख कोटींचं असल्याचं मोदींनी सांगितलं. देशाच्या सकल उत्पन्नाच्या १० टक्के रकमेचं पॅकेज सरकार जाहीर करत असल्याचं मोदी म्हणाले. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेश पॅकेज तयार करण्यात आलं असून त्यामुळे अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला दिलासा मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी बोलून दाखवला.
स्वावलंबी भारतासाठी एकूण २० लाख कोटींचे आर्थिक पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा
पंतप्रधान मोदींनी सांगितलंच, देशात 'असा' असेल लॉकडाऊनचा चौथा टप्पा