नवी दिल्ली : कोरोना ग्रस्त रुग्णांच्या ठिकाण्याची इतरांना माहिती मिळण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू हे अॅप आणले होते. मात्र, या अॅपवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोठी शंका उपस्थित केली आहे. यामुळे पुन्हा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
राहुल गांधी यांनी या अॅपद्वारे लोकांची खासगी माहिती चोरी आणि त्यांच्या खासगीपणाचा भंग होत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. आरोग्य सेतू ही एक लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेली प्रणाली आहे. ती एका खासगी कंपनीकडे देण्यात आलेली आहे. याद्वारे माहिती चोरी केली जाऊ शकते. तसेच खासगीपणाचाही भंग होऊ शकतो असा आरोप त्यांनी केला आहे. सरकारने लोकांना परवानगीशिवाय ट्रॅक करण्यासाठी त्यांच्यातील भीतीचा वापर करता नये, असेही गांधी म्हणाले.
यावर भाजपाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्यूत्तर देत रोज एक नवीन खोटे बोलत असल्याची टीका केली आहे. आरोग्य सेतू अॅप एक शक्तीशाली मित्र असून तो लोकांची सुरक्षा करत आहेत. यामध्ये माहिती सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत. ज्या लोकांनी आपले पूर्ण आयुष्य लक्ष ठेवण्यावर घालवले, त्यांना तंत्रज्ञानाचा वापर चांगल्यासाठीही करता येतो, हे कसे माहिती असेल, असा टोलाही त्यांनी राहुल गांधींना लगावला.
अन्य महत्वाच्या बातम्या...
धक्कादायक! महाराष्ट्रातून बसद्वारे मजुरांना नेले; युपीमध्ये 7 जण कोरोनाग्रस्त निघाले
मुंबई, पुणेकरांना परवानगी नाहीच! जिल्हांतर्गत प्रवासाला पोलिसांकडून नकार
CoronaVirus चिंताजनक! राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच; आज ३६ जणांचा मृत्यू
CoronaVirus दिलासादायक! गेल्या दोन दिवसांत धारावीत एकही मृत्यू नाही; पण...
जनधन खात्यांमध्ये 4 मेपासून पैसे जमा होणार; पण काढण्यासाठी अनोखा नियम